You are currently viewing ॲड.परिमल नाईक यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

ॲड.परिमल नाईक यांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

सावंतवाडी शहरातील विकास कामांबाबत चर्चा

सावंतवाडी:

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे सावंतवाडी येथील आपल्या निवासस्थानी वास्तव्यास असताना सावंतवाडी नगरपरिषदेचे माजी सभापती ॲड.परिमल नाईक यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सावंतवाडी शहराच्या विकासाबाबत चर्चा केली.

यावेळी उदय नाईक,सुधीर आडीवरेकर उपस्थित होते.
सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने सावंतवाडी मोती तलाव संवर्धन, मल्टी स्पेशालीटी हॉस्पीटल, शहरातील नियोजीत नळपाणी योजना,भुयारी गटार योजना, भूमीगत विजवाहिनी योजना, पर्यटन या विषयावर चर्चा केली तसेच गेली अनेक वर्ष कोल्हापुर खंडपीठ हा जो ज्वलंत विषय आहे त्यावर प्रदीर्घ चर्चा केली व सिंधुदुर्गातील न्यापीक पक्षकार व वकिलांना उच्च न्यायालय खंडपीठ अभावी भेडसावणारे विविध प्रश्न उपस्थित केले. अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यावर योग्य तोडगा लवकरात लवकर काढण्याचे आश्वासन दिले.

त्यावेळी श्री.महेश सारंग,ॲड. परिमल नाईक, श्री.उदय नाईक,श्री. सुधीर आडीवरेकर, श्री.संतोष गवस,श्री.अमित गवंडळकर,श्री.बाळा बो बोर्डेकर,श्री. रमेश बोंद्रे आधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा