You are currently viewing ‘जीवावरचे’ बेतले ‘मोटारसायकलवर’!

‘जीवावरचे’ बेतले ‘मोटारसायकलवर’!

मालवण
काहीसा अनुभव मसुरे येथील बबली चव्हाण यांनी रविवारी ‘तौक्तो’ या चक्री वादळा दरम्यान घेतला. येथील बबली चव्हाण हे आपली मोटारसायकल रस्ता लगत उभी करून रविवारी सकाळी ११ च्या सुमारास बाजारपेठे लगत खरेदी साठी थांबले होते. दरम्यान वादळी वारे व जोराच्या पावसामुळे डॉ. विश्वास साठे यांच्या घरा नजीकचा एक माड अर्ध्यावरून मोडून थेट रस्ता लगत उभ्या करून ठेवलेल्या चव्हाण यांच्या मोटारसायकल वरच कोसळला. माडाच्या झावळाचा फटका तेथे उभ्या असलेल्या निखिल सावंत या युवकाला काही प्रमाणात बसला. माडाचा बुंधा चव्हाण यांच्या पल्सर मोटारसायकल वर पडल्याने गाडीच्या टाकी सह इतर भागांचे नुकसान झाले. केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही. मसुरे पोलीस हरिश्चंद्र जायभाय, डॉ. विश्वास साठे, छोटू ठाकूर, श्री चव्हाण आदींनी रस्त्यावर मोडून पडलेला माड बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + fourteen =