“नाजूक”शा हॉटेलमध्ये तातडीची मिटिंग…..

“नाजूक”शा हॉटेलमध्ये तातडीची मिटिंग…..

संवाद मीडियाच्या बातमीमुळे साकेडीतील बैठक रद्द.

संबंधित यंत्रणेशी यशस्वी वाटाघाटी केल्यानंतर निर्धास्त झालेल्या जुगाराच्या बादशहांनी बेळणे, ता.कणकवली येथे आयोजन केलेली बैठक संवाद मीडियाने उघडे पडल्यावर रद्द केली होती. त्यानंतर कणकवली पासून ६ किमी साकेडी येथे आज संध्याकाळी जुगाराची बैठक बसविण्याचे प्लॅन तयार केले होते. घोडा मैदान जवळ असतानाच पुन्हा नवीन जागा संवाद मीडियाने जाहीर केल्यामुळे हैराण झालेल्या जुगाराचा बादशाह टिंगेल कॉन्टेरो, दात पडक्या आप्पा, विठ्ठल नाम जपणारा फोंडयाच्या पारावरचा विठ्ठल यांनी जुगाऱ्यांची तातडीची मीटिंग कणकवली येथीलच नाजूक शा हॉटेलात बोलावलेली आहे.
जुगाराच्या तक्षीमिसाठी निवडलेली प्रत्येक जागा, नवी रणनीती संवाद मीडिया बैठक बसण्याच्या आधीच जाहीर करत असल्याने जुगाराच्या बादशहांना खेळण्यासाठी मैदान उत्कृष्ठ असूनही अचानक पडलेल्या संवाद मीडियाच्या आफतीमुळे बैठक रद्द करावी लागत असल्याने त्यांच्यात चिंतेचे वातावरण आहे. संबंधित यंत्रणेने बातमी जाहीर झाल्यास त्याठिकाणी बैठक घेऊच नये अशी तंबी दिल्याने जुगाऱ्यांची कुचंबना झालेली आहे.
या सर्व गोष्टींवर विचारविनिमय करण्यासाठी आणि आपल्यातील कोण फुटीर आहे का? याचा शोध घेण्यासाठी कणकवलीतील नाजूकशा हॉटेलमध्ये आज संध्याकाळी तातडीची मिटिंग बोलावली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा