You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांचे उद्या सिंधुदुर्गात जंगी स्वागत केले जाणार

सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने खासदार संजय राऊत यांचे उद्या सिंधुदुर्गात जंगी स्वागत केले जाणार

शिवसेना,युवासेना,महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी,शिवसैनिक व जिल्हावासीयांनी उपस्थित रहावे

शिवसेना युवानेते संदेश पारकर व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे आवाहन

शिवसेनेची मुलुख मैदान तोफ फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत हे उद्या शुक्रवार दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सिंधुदुर्ग दौरयावर येत आहेत. सायंकाळी ५ वाजता कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये त्यांचे जोरदार जंगी स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांच्याशी संजय राऊत संवाद साधणार असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.त्यामुळे शिवसेनेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.शिवसेनेच्या संघटनात्मक वाढीसाठी हा दौरा फायदेशीर ठरणार आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व सिंधुदुर्ग जिल्हा वासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना युवानेते संदेश पारकर व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले. कणकवली विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषेदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक उपस्थित होते.
संदेश पारकर पुढे म्हणाले, खरंतर खासदार संजय राऊत यांचा जो राजकीय प्रवास आहे. शिवसेनेवरची त्यांची असलेली निष्ठा, सामना वृत्तपत्रातून त्यांचे असलेले रोखठोक लिखाण त्यातून शिवसेनेची ज्वलंत भूमिका ते सातत्याने मांडत आहेत. ईडीच्या कारवाईमुळे खर तर ज्या पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झाला. त्यांची चौकशी लावून त्यांना तुरुंगात रहावं लागल. एक निर्भीड लढवय्या नेतृत्व म्हणून संजय राऊत यांच्याकडे पाहिले जाते. पक्षप्रमुख राज्याचे माजी .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर निष्ठा ठेवून शिवसेनेशी प्रामाणिक राहून शिवसेनेने जी लढाई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये,देशांमध्ये उभी केली त्याबाबत शिवसेनेची स्पष्ट भूमीका त्यांनी ही जनतेच्या समोर सातत्याने मांडली. ज्या पद्धतीने शिवसेनेला लोकमान्यता मिळत आहे उद्धवजींचे आदित्यजी,संजय राऊत यांच्या सभांना ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोक गर्दी करत आहेत. हेच शिवसेनेचे भांडवल आहे.हीच लोकांच्या मनात शिवसेनेबद्दल असलेली आस्था आहे. येणाऱ्या काळामध्ये कोर्टाचा जो निकाल आहे तो नक्कीच शिवसेनेच्या बाजूने लागेल आणि जनतेच्या न्यायालयातही भविष्यात ज्या ज्या वेळी निवडणूका होतील तेव्हा शिवसेनाच विजयी होईल.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपंचायती,नगरपालिका या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडी विरोधकांना आपले अस्तित्व दाखवून देतील. जी आव्हाने शिवसेनेसमोर उभी टाकली त्या सगळ्या आव्हानांना सडेतोड उत्तर देण्याचे काम संजय राऊत यांनी केले आहे शिवसेनेची स्पष्ट भूमिका दर दिवशी मांडण्याचे काम ते करत आहेत.त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेना या राज्यात मोठ्या ताकतीने उभी राहील आणि नक्कीच पुन्हा एकदा शिवसेना आणि महाविकास आघाडीचे सरकार या राज्यात येईल असे संदेश पारकर यांनी सांगितले.
सतीश सावंत म्हणाले, इडी,सीबीआय चौकशा होऊ नये म्हणून इतर सर्वजण सैरभैर पळत होते. मात्र संजय राऊत यांनी ईडीचे आव्हान मोडून काढले. संजय राऊत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत त्यांचे जिल्ह्यात स्वागत आहे. शिवसेनेच्या पडत्या काळात संजय राऊत यांनी शिवसेना सावरण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांच्या रुपाने असलेला शिवसेनेचा धगधगता निखारा तेजोमय करण्याचे काम संजय राऊत यांनी केले. ज्वलंत विचार असलेले संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा त्यांच्या पाठीशी खंबीर उभा होता. संजय राऊत यांनी ईडीच्या विरुद्ध ज्या प्रकारे लढाई केली.शिवसेनेसाठी झगडले,तुरुंगवास सोसला अशा लढवय्या नेत्याच्या स्वागतासाठी शिवसेना युवासेना, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी, व जिल्हावासीयांनी कणकवलीत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सतीश सावंत यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा