You are currently viewing भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ” सेवा पंधरवडा ” चा शुभारंभ

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ” सेवा पंधरवडा ” चा शुभारंभ

सागर किनारा स्वच्छता अभियानाने केला प्रारंभ

वेंगुर्ले

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर प्रथम अभियान राबवीले ते ” स्वच्छ भारत मिशन ” . हया अंतर्गत घरोघरी शौचालये , कचरा मुक्त शहर असे उपक्रम राबवुन जनतेपर्यंत स्वच्छतेचे महत्व पटवीण्यासाठी प्रयत्न केले . त्यामुळे प्रत्येकाच्या मनात आपला परीसर स्वच्छ असला पाहिजे ही भावना निर्माण करण्यात पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा मोलाचा वाटा आहे .म्हणुनच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे आवडते अभियान ” स्वच्छता अभियान ” आयोजित करुन ” सेवा पंधरवडा ” कार्यक्रमाचा वेंगुर्ले तालुक्याचा शुभारंभ केला.


यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , नगराध्यक्ष राजन गीरप , जिल्हा उपाध्यक्ष अॅड सुषमा खानोलकर , उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , जिल्हा का का सदस्य वसंत तांडेल , ता सरचिटणीस बाबली वायंगणकर , शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण , नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेवक नागेश उर्फ पींटू गावडे , नगरसेविका साक्षी पेडणेकर व ईशा मोंडकर , महिला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , महिला मोर्चाच्या रसीका मठकर , लायनेस क्लबच्या उर्मिला सावंत , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , उभादांडा शक्ती केंद्र प्रमुख निलेश मांजरेकर , युवा मोर्चाचे पिंटु सावंत – भुषण सारंग – अमेय धुरी , बुथप्रमुख सुधीर पालयेकर , बुथप्रमुख बाबुराव मेस्त्री , बुथप्रमुख वेंगुर्लेकर , बुथप्रमुख पुंडलिक हळदणकर , अशोक खराडे , सुधाकर वेंगुर्लेकर , रामचंद्र आरावांदेकर , देविदास मोठे , निलेश खडपकर , श्रीकांत तांडेल , अजय आरोलकर , फारुक हुसेन इत्यादी भाजपा कार्यकर्ते तसेच मच्छीमार बांधव या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 1 =