You are currently viewing कुणकेश्वर यात्रेसाठी सिंधुदुर्ग एसटी विभाग सज्ज..

कुणकेश्वर यात्रेसाठी सिंधुदुर्ग एसटी विभाग सज्ज..

८० बसेसच्या माध्यमातून जादा फेऱ्या.

कणकवली

कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी रा. प. महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागाने नियोजन केले आहे. त्यानुसार कणकवली, देवगड, मालवण व विजयदुर्ग या आगारातून एकूण ८० बसेसच्या माध्यमातून फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. याशिवाय मेढा, हिरण्यकेशी, खानोली, नेरुर, हुमरमळा, रामेश्वर, कुंभवडे येथेही यात्रोत्सवासाठी जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

मालवण आगारातून २० बसेस सोडण्यात येणार असून सोडण्यात येणाऱ्या बसेसमध्ये मालवण- कुणकेश्वर आठ बसेस, हिर्लेवाडी- बौद्धवाडी- कुणकेश्वर, भगवंतगड- बांदिवडे- आचरा तिठा – कुणकेश्वर व तोंडवली- वायंगणी- कुणकेश्वर प्रत्येकी एक बस, आडबंदर- मुणगे- हिंदळे- मिठबांव- कातवण कुणकेश्वर पाच बसेस व तांबळडेग – कुणकेश्वर व मोर्वे- कुणकेश्वर अशा प्रत्येकी दोन बसेस सोडण्यात येणार आहेत. कणकवली आगारातून २५ बसेस सोडण्यात येणार असून यात कणकवली- कुणकेश्वर २५ फोंडा – कुणकेश्वर चार व वैभववाडी- नांदगाव- कुणकेश्वर एक अशा बसेस सोडण्यात येणार आहेत.

देवगड आगारातून ३२ बसेस सोडण्यात येणार असून यात देवगड- कुणकेश्वर १३, निरोम- आरे- कुणकेश्वर, किंजवडे- कुणकेश्वर, पोयरे नारिंग्रे कुणकेश्वर, तेलीवाडी- वानिवडे- कुणकेश्वर, नाद ओंबळ- कुणकेश्वर, शिरवली- कुणकेश्वर, रेंबवली- साळशी- चाफेड- कुणकेश्वर, मोडतर- कुणकेश्वर, वळीवंडे- कुणकेश्वर, बागतळवडे – तळेबाजार- कुणकेश्वर प्रत्येकी एक, मिठमुंबरी- इळयेसडा- कुणकेश्वर, आयनल- कोळोशी- कुणकेश्वर व टेंबवली- तेलीवाडी-कुणकेश्वर प्रत्येकी दोन, जामसंडे- कुणकेश्वर तीन अशा बसेस सोडण्यात येणार आहेत. विजयदुर्ग-कुणकेश्वर तीन बसेस सोडण्यात येणार आहेत. सावंतवाडी आगारातून मेढा ४ बसेस, हिरण्यकेशी चार बसेस, वेंगुर्ले आगारातून खानोलीसाठी पाच बसेस, कुडाळ आगारातून नेरुरसाठी तीन बसेस, हुमरमळासाठी १, विजयदुर्गमधून रामेश्वरसाठी एक बसेस तर कणकवली तालुक्यातून कुंभवडेसाठी एक अशा बसेस सोडण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + two =