You are currently viewing दोडामार्ग तालुक्यातील बहुचर्चित प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशीचे उद्या शिवसेने (उ. बा. ठाकरे) कडून लोकार्पण – बाबुराव धुरी 

दोडामार्ग तालुक्यातील बहुचर्चित प्राथमिक आरोग्य केंद्र साटेली भेडशीचे उद्या शिवसेने (उ. बा. ठाकरे) कडून लोकार्पण – बाबुराव धुरी 

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात बहुतांशी ग्रामीण भागाला आरोग्य सेवा पुरवणाऱ्या साटेली भेडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे तमाम शिवसैनिक उद्या १५ फेब्रुवारी रोजी करतील, मी माझ्या निर्णयावर ठाम असून प्रशासनाच्या दिरंगाईने हा लोकार्पण सोहळा रखडत आहे, त्यामुळे उद्या १५ फेब्रुवारी रोजी हा सोहळा आम्ही पार पाडू असे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

या नुतन इमारतीतील लाईट, पाणी आदी सुविधा पूर्ण आहे, या इमारतीची पाहणी आज १४ फेब्रुवारी रोजी बाबुराव धुरी यांनी उपतालुकप्रमुख मिलिंद नाईक व शिवसैनिकांसह केली, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. या अगोदर आपण प्रशासनाला इशारा दिला होता मात्र त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही त्यामुळे लोकांच्या सोयी साठी या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा होईल,यासाठी या पंचक्रोशीतील शिवसैनिक, ग्रामस्थ यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बाबुराव धुरी यांनी केले असून या लोकार्पण सोहळ्यास जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.खलिफे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश करतस्कर यांनीही उपस्थित राहावें असे आवाहनही प्रसिद्धी पत्रकात श्री. धुरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =