वीज कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

वीज कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

नितेश राणेंच्या वाढदिनी नगराध्यक्ष समीर नलावडेंचा उपक्रम

कणकवली
दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना आमदार नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी रेनकोट देऊन सत्कार केला.

 

तौक्ते वादळात कणकवली शहरातील वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी शहरात कार्यरत असलेल्या 13 वीज कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली होती. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेला सलाम म्हणून 23 जून रोजी शहरात कार्यरत असणाऱ्या सर्व विजतंत्री कर्मचाऱ्यांना नगराध्यक्ष दालनात समीर नलावडे यांच्या हस्ते रेनकोट देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी नगर सेवक विराज भोसले गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, बाबू गायकवाड , नगरसेविका राणे, व वीज महावितरण साह्यायक अभियंता कांबळे एस. जी. पवार ,के. जी. तांबे आर जि सातवसे ,एस. एम. आचरेकर, वाय. पी राऊत उपस्थित होते

प्रतिक्रिया व्यक्त करा