You are currently viewing कोकण रेल्वे बाबतच्या प्रलंबित मागण्यांसाठी डी. के. सावंत यांचे उपोषण

कोकण रेल्वे बाबतच्या प्रलंबित मागण्यांसाठी डी. के. सावंत यांचे उपोषण

मळगाव ग्रामपंचायत सह रिक्षा संघटनेचा पाठिंबा

सावंतवाडी
कोकण रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसंदर्भात कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे अध्यक्ष डी के सावंत यांनी सावंतवाडी रोड रेल्वे स्थानका समोर आज उपोषण छेडले. मळगाव ग्रामपंचायत, रेल्वे स्थानक रिक्षा संघटना व मळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या उपोषणास पाठिंबा दिला.

यावेळी डी के सावंत यांच्यासह, प्रवासी संघटनेचे सचिव सतीश पाटणकर, बाप्पा नाटेकर (राष्ट्रीय काँग्रेस उपाध्यक्ष ओबीसी सेल), मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सभापती राजू परब, माजी सरपंच निलेश कुडव, भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख निळकंठ बुगडे, पोलीस पाटील रोशनी जाधव, गुरुनाथ गांवकर, निलेश चव्हाण, निलेश राऊळ, प्रमोद खानोलकर, सुहास पेडणेकर, आनंद गोसावी, निकिता बुगडे, सुभद्रा राणे, निकिता राऊळ, अनुजा खडपकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्या, रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मळगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी संघटनेच्या वतीने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोंकण रेल्वे मार्गावरील दिर्घकाळ प्रलंबित मागण्या डी के सावंत यांनी मांडल्या. यात सकाळी दादर-रत्नागिरी पॅसेंजर, सायंकाळी डहाणू-सावंतवाडी व नाशिक सावंतवाडी एक्सप्रेस. ■ डहाणू पनवेल मेमू चिपळूण पर्यंत, पुणे-सावंतवाडी कल्याण मार्गे गाडी, सकाळी सावंतवाडी- मुंबई जनशताब्दी कायमस्वरूपी व्हावी, ‘कारवार- पेडणे पॅसेंजर सावंतवाडी कुडाळपर्यंत यावी, मुंबई येथून दक्षिणेकडे जाणाऱ्या सर्व गाड्याना प्रत्येक जिल्ह्यात तिन थांबे तसेच उत्तरेकडुन येणाऱ्या गाड्यांना प्रत्येक जिल्ह्यात कमीतकमी दोन थांबे देण्यात यावे, सावंतवाडी येथे पूर्णवेळ तिकीट आरक्षण खिडकी सुरू करण्यात यावी, गरीब रथ एक्सप्रेस ४ ते ५ तास अगोदर किंवा उशिरा करावी, कोंकण रेल्वेचे स्वतंत्र अस्तित्व ठेऊन भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यात यावे, कोंकण रेल्वेचे मुख्यालय रत्नागिरी ते गोवा दरम्यान तळ कोकणातच असावे, सुट्टीकालीन व सणासुदीच्या ज्यादा गाड्या सावंतवाडी स्टेशनवर सायंकाळी ४ पुर्वी पोहोचाव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा