You are currently viewing बैलगाडा स्पर्धेचे विश्वकर्मा मित्रमंडळाकडून उत्कृष्ट नियोजन -आ. वैभव नाईक

बैलगाडा स्पर्धेचे विश्वकर्मा मित्रमंडळाकडून उत्कृष्ट नियोजन -आ. वैभव नाईक

कणकवलीत विश्वकर्मा मित्रमंडळाच्या राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवलीच्या चंद्रकांत सावंत यांचा बैलगाडा प्रथम

युवानेते संदेश पारकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन

आ.वैभव नाईक,सतीश सावंत,सुशांत नाईक,प्रतीक मेस्त्री यांची प्रमुख उपस्थिती

शेतकरी आपल्या गायी, बैलांना मनापासून जपतो. त्यांच्यावर त्यांचा मोठा जीव असतो. ही जनावरेही शेतकऱ्यांवर फार प्रेम करतात. शेतकऱ्यांनी मनापासून जपलेली संपत्ती अशा स्पर्धांमधून मैदानात उतरवतो. त्यावेळी मनापासून त्यांची काळजीही घेतो. ग्रामीण भागात असे दिसणारे चित्र आज नगरपंचायत क्षेत्रातही प्रथमच या स्पर्धेमधून दिसले. स्पर्धेच्या देखण्या आयोजनाबद्दल विश्वकर्मा मित्रमंडळाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी नगरसेवक सुशांत नाईक यांनीही पाठपुरावा करून सहकार्य केले, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

कणकवली निमेवाडी- सुतारवाडी येथील मैदानात विश्वकर्मा मित्रमंडळाच्यावतीने राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धा रविवारी संपन्न झाली.आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे युवानेते संदेश पारकर यांच्या हस्ते स्पर्धेचे श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आमदार वैभव नाईक बोलत होते.स्पर्धेत सुमारे २९ बैलगाडे सहभागी झाले होते.
यावेळी विश्वकर्मा मंडळाचे अध्यक्ष प्रतीक मेस्त्री,शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक,नगरसेवक रुपेश नार्वेकर, नगरसेवक कन्हैया पारकर, हरकुळ बु. सरपंच बंडू ठाकुर, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, युवासेना तालुका समन्वयक तेजस राणे, महिला उपशहरप्रमुख दिव्या साळगावकर,आबा दुखंडे, सदानंद राणे,मंगेश राणे,अंबाजी राणे, जयेश धुमाळे, महेश देसाई आदींसह नायब तहसीलदार एस. व्ही. राठोड, पोलीस उपनिरीक्षक सागर खंडागळे, आरोग्य अधिकारी डॉ. गोसावी, मंडळाचे चंद्रकांत मेस्त्री, कल्पेश मेस्त्री, दत्तू मेस्त्री, प्रकाश मेस्त्री,. बबन पांचाळ, सुभाष मेस्त्री, अरुण मेस्त्री, विष्णू मेस्त्री, दशरथ मेस्त्री, प्रथमेश मेस्त्री ,नितीन पांचाळ ,अक्षय मेस्त्री, नीलकंठ मेस्त्री,संतोष राणे,महेश राणे,अमित मयेकर,प्रशांत साटम,दशरथ देसाई उपस्थित होते.
स्पर्धेत ४०० मीटर अंतर बैलगाड्यांना पार करायचे होते. यात कणकवलीच्या चंद्रकांत सावंत यांचा प्रथम क्रमांक (वेळ ४८.१९), कुंदे येथील राजू बागवे (४९.७२) यांचा द्वितीय क्रमांक तर पावशी कुडाळ येथील चंद्रकांत वाटवे (५०.९१) यांचा तृतीय क्रमांक आला. पहिल्या तीन क्रमांकाना अनुक्रमे १५ हजार, १० हजार व ५ हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट बैलगाडी म्हणून होडावडे – वेंगुर्ल्याच्या प्रथमेश होडावडेकर यांना तर उत्कृष्ट चालक म्हणून हळवलच्या संतोष ठाकुर यांना गौरविण्यात आले. विजेत्या चंद्रकांत सावंत यांच्या बैलजोडीला प्रेक्षकांमधून सुमारे १० हजाराची बक्षिसे देण्यात आली.
*यावेळी संदेश पारकर म्हणाले,* या स्पर्धेची माहिती केवळ मिळाल्यानंतर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धेसाठी गाड्या आल्या नाहीतर सभेसाठी गाड्या बोलवाव्या लागतात.असे सांगत स्पर्धा आयोजनाबद्दल विश्वकर्मा मित्रमंडळाचे त्यांनी अभिनंदन केले.*
सुशांत नाईक म्हणाले,स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविल्यानंतर स्पर्धेची रितसर परवानगी घेण्यात काही दिवस गेले.त्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत होतो.सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या स्पर्धा संपन्न झाली. याठिकाणी
निवडणुकीचा नाही तर बैलगाडी स्पर्धेचा धुरळा उडाला आहेअसे सांगितले. सतीश सावंत यांनीही स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल मंडळाचे कौतुक केले.
बक्षीस समारंभाला नगरसेवक सुशांत नाईक, महेश देसाई, जयू धुमाळे, नायब तहसीलदार एस. व्ही. राठोड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश पवार यांनी तर स्पर्धेचे सूत्रसंचालन बाळू वालावलकर यांनी केले. स्पर्धेला मोठ्या संख्येने क्रीडारसिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा