You are currently viewing अटल प्रतिष्ठानला जागतिक पाणि परिषदेचे (WORLD WATER COUNCIL)सभासदत्व बहाल..
अटल प्रतिष्ठानला जागतिक पाणि परिषदेचे (WORLD WATER COUNCIL)सभासदत्व बहाल..

अटल प्रतिष्ठानला जागतिक पाणि परिषदेचे (WORLD WATER COUNCIL)सभासदत्व बहाल..

कोरोनाने साऱ्या जगाला आणि विशेषतः मनुष्यप्राण्याला एक सणसणीत संदेश दिलेला आहे.यापुढे निसर्गाशी कोणतीही खिलवाड करायची नाही. प्राणी,जंगले,वनस्पती आणि जीवनाला सर्वात आँक्सीजन एवढेच आवश्यक पाणी अशा विषयात प्रत्येकानेचं गांभीर्याने वागले पाहिजे हाच संदेश विचारात घेऊन जागतिक स्तरावर गेली काही वर्षे वर्ल्ड वाँटर कौन्सिल पाणी या महत्त्वाच्या विषयावर काम करत आहे.
अनेकदा असं म्हटल जात की
भविष्यात पाण्यासाठीही युध्द होवू शकत. हे वास्तव फार दुर नाही. प्रत्येक देशात पाण्याचे योग्य नियोजन व्हावे. त्याचबरोबर सँनिटायझेशन सारख्या विषयातही मानव जातीच्या आरोग्याच्या द्रष्टीने सजगपणे विचार व्हावा.पाण्याचा कुठेही दुरूपयोग होवू नये..पाण्यासारखा अत्यावश्यक घटकाबाबत मोठ्या प्रमाणात जागतिक स्तरावर जनजागृती व्हावी या उद्देशाने जागतिक पाणी परिषदची स्थापना झाली.जगभरातील पन्नास देशातील विविध सामाजिक संस्था या परिषदेच्या सभासद असून या परिषदेचे मुख्य कार्यालय मार्साईल, फ्रान्स येथे असून संपूर्ण जगातील पाणी या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन, प्रचार- प्रसार आणि नियोजन केले जाते.
अटल प्रतिष्ठानला ही संधी गेली काही वर्षे पाणी प्रश्नावर सातत्याने सक्रीयपणे काम करणारे पुण्यातील आमचे मित्र श्री अनिल पाटील व श्री सुनील जोशी यांच्या विशेष प्रयत्नामुळे मिळाली
अटल प्रतिष्ठान समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असून याही क्षेत्रात पुढील काळात भरीव काम करण्याचा मनोदय अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अँड.नकुल पार्सेकर व कार्यवाह डॉ. राजशेखर कार्लेकर यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven + eight =