You are currently viewing जलजीवन योजनेंतर्गत २०२ कोटीच्या आराखड्यातून ४२२ नळयोजना मंजूर

जलजीवन योजनेंतर्गत २०२ कोटीच्या आराखड्यातून ४२२ नळयोजना मंजूर

ग्रा. पा. पु. कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांची माहिती

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध प्रकारच्या ४२२ नळयोजना कामांसाठी जलजीवन योजने अंतर्गत सुमारे २०२ कोटीच्या आराखड्याला पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिली आहे. अशी माहिती पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता श्रीपाद पाताडे यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ ८ गावे ६२६ वाड्यांचा समावेश असलेल्या ६ कोटी ४० लाख ४७ हजार रुपयाच्या पाणीटंचाई आराखड्याला जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात पाणी टंचाई जाणवत नाही.मात्र तिसऱ्या टप्प्यात एप्रिल ते जून या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही गांवामध्ये पाणी टंचाई जाणवते.संभाव्य पाणी टंचाई निवारण्यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ८ गावे व ६२६ वाडयाचा समावेश असलेला ६ कोटी ४० लाख ४७ हजार रूपये खर्चाचा आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजूरी साठी पाठविलेल्या आराखडयाला जिल्हाधिकारी यांनी मंजूरी दिली आहे.तर शासनाच्या जलजीवन योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २९४ महसूल गावातील लाभार्थीना वैयक्तिक नळ जोडणी करणे, १५८ ठिकाणी नवीन नळ पाणी योजना तयार करणे, तसेच ज्या शाळांना व अंगणवाड्यांना नळाद्वारे पाणी नाही अशा १८५ शाळा आणि ३८२ अंगणवाड्याना नळाद्वारे पाणी देने. अशा एकूण सुमारे २०२ कोटीच्या ४२२ कामाना पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संभाव्य पाणी टंचाई आराखडयात नळपाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्ती साठी ३ कोटी ५ लाख ३० हजार , विंधन विहीर विशेष दुरुस्त करणे ५ लाख ६० हजार, नवीन विंधन विहीर घेणे २ कोटी १० लाख ७० हजार, तात्पुरती पूरक नळ योजना घेणे ५९ लाख ७५ हजार, विहीर खोल करणे- गाळ काढणे- सार्वजनिक विहीर दुरुस्त करणे ५९ लाख १२ हजार, एवढ्या निधीची तरतूद करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ गावे व ६२६ वाड्याचा समावेश असलेला एकूण ६ कोटी ४० लाख ४७ हजार रुपये खर्चाच्या पाणीटंचाई आराखड्याला जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. याव्यतिरिक्त जलजीवन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी दिले जाणार आहे. त्या अनुषंगाने नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी २९४ महसूल गावातील नळ जोडणी करणे तसेच १५८ नवीन नळ योजनांची कामे करणे, १८५ शाळा आणि ३८२ अंगणवाडी केंद्र यांना नळाद्वारे पाणी देणे अशा एकूण २०२ कोटीच्या ४२२ कामांना पालकमंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिली आहे. अशी माहिती श्रीपाद पाताडे यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा