You are currently viewing अवैध्य दारू मधून मिळणारा बक्कळ पैसा जुगाराचा फडावर..

अवैध्य दारू मधून मिळणारा बक्कळ पैसा जुगाराचा फडावर..

कोण आहे हा सिंधुदुर्गातील गॅम्बलर?

कणकवली :

 

गोवा राज्यातील करमुक्त दारूचे सिंधुदुर्ग कनेक्शन जगजाहीर झाले आहे. वरिष्ठ पातळीवरून हालचाल झाल्यावर काही दिवस राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी दारूच्या गाड्यांवर कारवाई करतात, परंतु त्यानंतर मात्र राजरोसपणे दारूच्या गाड्या जिल्ह्याच्या सीमेवरील पोलीस लाठीवर चिरीमिरी देत बिनदिक्कत पणे दारूची वाहतूक करतात.

राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांना न जुमानता जिह्यातील बेकायदेशीर दारू व्यवसाय करणारे व्यापारी तवेरा, स्विफ्ट, स्विफ्ट डिझायनर, आणि SX4 शा चार महागड्या गाड्यांमधून दररोज बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू गोव्यातून भरून आणतात आणि फोंडयात खाली करतात. रात्री ८ वाजता फोंडयातून या गाड्या गोव्याकडे जाण्यासाठी सुटतात आणि रात्री कधी पत्रादेवी तर कधी पेडणे येथे दारूने लोड केल्या जातात. जिल्ह्याच्या सीमेवरील लाठ्यांवर चिरीमिरी देत या गाड्या राजरोसपणे जिल्ह्यात येतात, फोंडयात रात्री १२ ते २ या वेळेत खाली होतात. तिथून पुढे दुसऱ्या गाड्यांमधून कोल्हापूर, निपाणी, सांगली येथे विनासायास पुरवठा केला जातो.

गोव्यातून बेकायदेशीर आणलेल्या दारूत बक्कळ पैसा मिळतो. हा पैसा बऱ्याचदा हे गैरधंदेवाले जुगाराच्या बैठकांमध्ये उडवतात, अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे बसवतात, मोठमोठ्या तकशीम घेतल्या जातात. त्यामुळे दारूच्या धंद्यातून आलेल्या पैशांवर पुन्हा एकदा दुसरा गैरधंदा उभा राहतो, ज्यात गैरधंदेवाले पैशांवर पैसे मिळवतात परंतु पैसे मिळविण्याच्या आशेपोटी जुगार खेळणारे कित्येक लोक जुगारात बरबाद होतात.

दारूच्या अवैध वाहतुकीमध्ये कितीतरी तरुण मुले वाहक म्हणून राहतात, पायलटिंग करतात, आणि पैशांच्या आशेपोटी आपल्या आयुष्याची वाट लावून घेतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 7 =