*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।
___________________________
श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ८९ वे
अध्याय -१५ वा , कविता- ५ वी
___________________________
सरकारने शिक्षा सुनावली टिळकांसी । नेले त्यांना दूर
ब्रह्मदेशी। टाकिले मंडालेच्या तुरुंगात ।।१ ।।
शिक्षा भोगतांना एक झाले । टिळकांच्या हातून लेखन झाले। जे लेखन सिद्ध झाले । “गीतारहस्य ” ग्रंथरूप नाव त्याचे ।। २ ।।
लेखन त्यांचे हे महत्वाचे । भाष्य असे भगवदगीतेवरचे ।
सुगम सर्वांसाठीचे । असे हे लेखन लोकमान्यांचे ।।३।।
गीताशास्त्राचे महत्व अपार ।तेच टिळकांनी लिहिले साचार ।
आहे भगवदगीतेचे सार ।ग्रंथ गीतारहस्य हा ।। ४ ।।
ग्रंथ गीतारहस्य लेखन । टिळकांचे कार्य थोर महान ।
वाचक,अभ्यासू करिती गुणगान । टिळकांच्या कार्याचे ।।५ ।।
कोल्हटकरास स्वामी म्हणाले होते । होणार आहे मोठे कार्य टिळकांच्या हाते । स्वामींच्या शब्दात हेच अर्थ होते ।
गीतारहस्य ग्रंथ उदाहरण त्याचे होय ।। ६ ।।
******************************
क्रमशः करी हे लेखन कवी अरुणदास
__________________________
कवी- अरुणदास- अरुण वि.देशपांडे -पुणे.
___________________________