You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक १४ व १५ फेब्रुवारी रोजी

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक १४ व १५ फेब्रुवारी रोजी

वेंगुर्ला

वेंगुर्ला येथील सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या सभेत भंडारी समाजातील तरुण समाज बांधवांना समाजकार्याची गोडी लावण्यासाठी व करिअर घडविण्यासाठी महासंघाने यावर्षी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरवले असून त्याचे यजमानपद वेंगुर्ला तालुक्याला देण्याचे ठरले.

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ, सिंधुदुर्गची सभा येथील साईमंगल कार्यालयात भंडारी महासंघाचे अध्यक्ष रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाचे सरचिटणीस विकास वैद्य, उपाध्यक्ष सुनील नाईक, खजिनदार लक्ष्मीकांत मुंडे, सदस्य अतुल बंगे, राजू गवंडे, जयप्रकाश चमणकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, दिलीप पेडणेकर, उल्हास हळदणकर, मनोहर पालेकर, सुरेश धुरी, भरत आवळे गुरुजी, प्र. आनंद बांदेकर, दीपक कोचरेकर इत्यादी बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

या सभेत अजेंड्याप्रमाणे विषयवार चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. वेंगुर्ल येथे १४ व १५ फेब्रुवारी रोजी होणा-या क्रिकेट स्पर्धेत ८ तालुक्याचे क्रिकेट संघ सहभाग घेणार असून त्यातून उत्कृष्ट असा सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी संघ निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी नियोजन समिती स्थापन केलेली असून आहे. या समितीचे प्रमुख बाबली वायंगणकर, जयराम वायंगणकर, राजू गवंडे हे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ राज्य पातळीवर खेळविण्यासाठी महासंघ प्रयत्न करणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा