You are currently viewing काळसे रमाईनगर ग्रामस्थांचा रास्ता रोको ; डंपर अपघातातील डंपरमालक हजर न झाल्याने आक्रमक पवित्रा

काळसे रमाईनगर ग्रामस्थांचा रास्ता रोको ; डंपर अपघातातील डंपरमालक हजर न झाल्याने आक्रमक पवित्रा

मालवण

काल सायंकाळी काळसे होबळीचामाळ येथे झालेल्या भीषण अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आज दुपारनंतरही अपघात ग्रस्त डंपरचा मालक न आल्याने मयताचे नातेवाईक आणि काळसे रमाईनगर येथील ग्रामस्थांनी आज दुपारी आणि सायंकाळी काही वेळ रास्ता रोको केला. आणि जोपर्यंत डंपर मालक हजर होऊन नातेवाईकांच्या मागण्या पूर्ण करून अपघातग्रस्त जखमी आणि मयतांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मयत रुक्मिणी काळसेकर यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्रा घेतला. या रास्ता रोको मध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर ,विलास कुडाळकर माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव ,भूपेश चेंदवणकर राजन आंबेरकर यांच्यासह काळसे रमाईनगर ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा