जामसंडे येथे डबक्यात पडून सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यु घटना…

जामसंडे येथे डबक्यात पडून सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यु घटना…

देवगड
सहकारी मित्रांबरोबर खेळत असताना पाण्याचा डबक्यात  पडून भावेश पिराजी कर्पे सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना जामसंडे बौध्दवाडी येथे मंगळवारी सायंकाळी ४.३० वा.सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनूसार, जामसंडे बौध्दवाडी येथे राहत असलेला भावेश पिराजी कर्पे(६) या मुलगा सायंकाळी ४ वाजता इतर सहकारी मित्रांसोबत खेळत होता.खेळताना धावत जाताना अचानक पाणी भरलेल्या डबक्यात पडला. तो दिसत नसल्याचे पाहून त्याची शोधाशोध करण्यात आली यावेळी डबक्यात तरंगत असलेला दिसल्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी देवगड ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे जाहीर केले.
मयत भावेश हा आई, आजोबा, आजी यांच्यासमवेत जामसंडे बौध्दवाडी येथील घरी राहत होता.त्याचे वडील नोकरीनिमित्त बाहेर गावी असून त्याचे आजोबा आचरा येथे त्यांचा दुस-या मुलाकडे गेले होते.
खेळत असताना डबक्यात पडून भावेश याचा झालेल्या दुर्दैवी मृत्युमुळे जामसंडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.देवगड पोलिस स्थानकात खबर दिल्यानंतर सायंकाळी उशिरा देवगड पोलिस निरिक्षक \ुलचंद मेंगडे व त्यांचा सहका-यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा