You are currently viewing लिंगडाळचे माजी सरपंच,शरद पवार (राष्ट्रवादीचे)दशरथ लोके व उबाठा गटाचे कार्यकर्ते भाजपात

लिंगडाळचे माजी सरपंच,शरद पवार (राष्ट्रवादीचे)दशरथ लोके व उबाठा गटाचे कार्यकर्ते भाजपात

*लिंगडाळचे माजी सरपंच,शरद पवार (राष्ट्रवादीचे)दशरथ लोके व उबाठा गटाचे कार्यकर्ते भाजपात*

*आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

देवगड

लिंगडाळचे माजी सरपंच व राष्ट्रवादीचे खंदे कार्यकर्ते दशरथ शंकर लोके यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थतीमध्ये भाजपामध्ये आज लिंगडाळ येथे प्रवेश केला.
त्यांच्यासोबत त्यांची पत्नी वकील दिया लोके यांच्यासह लिंगडाळ मधील अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर तसेच देवगड अर्बन बँकेचे चेअरमन सदा ओगले यांच्यासह जिल्हा सरचिटणीस संदीप साटम व अनेक भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रवेशामुळे देवगड तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला मोठा दणका बसला आहे.
दशरथ लोके यांच्या समवेत चंद्रकांत धोंडू सावंत. रमेश अर्जुन गायकवाड. अनंत रघुनाथ सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनीच आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + 11 =