You are currently viewing बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इमारतीवर सोलर पॅनल बसवल्याने मिळाली वीज बिल मुक्ती

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इमारतीवर सोलर पॅनल बसवल्याने मिळाली वीज बिल मुक्ती

बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन इमारतीवर सोलर पॅनल बसवल्याने मिळाली वीज बिल मुक्ती

पत्रकार भवनात सोलर पॅनल, टावर एसी, कॅन्टीग बांधकामासाठी ४७ लाखांचा निधी

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या पाठपुराव्याला यश

ओरोस :

सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बाळशास्त्री जांभेकर स्मारक इमारतीच्या छतावर पर्यावरण पूरक सोलर पॅनल बसविण्यात आले आहे.त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून २० लाख २८ हजार ६१५ रुपये सोलर पॅनल बसविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. सोलर पॅनल, टॉवर एसी व कॅन्टींग साठी सातत्याने जिल्हा पत्रकार संघाने पाठपुरावा केल्याने एकूण ४७ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.आता पत्रकारांनी पर्यावरणाचा संदेश देत सोलर पॅनल बसवत एक समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळे पत्रकार भवनातील या सोलर पॅनल मुळे वीज बिल मुक्ती मिळून व्यवस्थापन खर्च कमी होईल, अशी माहिती जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी दिली.

पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भावनांमध्ये होणारा खर्च कमी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, त्याचबरोबर उर्वरित कामाला प्राधान्याने निधी उपलब्ध करु, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार तातडीने जिल्हा नियोजन च्या माध्यमातून बाळशास्त्री जांभेकर भवनांच्या इमारतीवर सोलर पॅनल यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मधून या इमारतीमध्ये कॅन्टीन उभारण्यासाठी १८ लाखाचा निधी देखील समितीमधून देण्यात आला असून लवकरच कार्यारंभ आदेश मिळणार आहे. या सभागृहांमध्ये पत्रकार सभासदांच्या सूचना आल्यानंतर तातडीने टॉवर एसी मागणी जिल्हा पत्रकार संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची दखल घेऊन तातडीने ६ टॉवर एसी मंजूर करण्यात आले असून त्यासाठी ९ लाख ४० हजार ९१८ रुपये निधी जिल्हा नियोजन मधून देण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार सघाने सोलर पॅनल, टॉवर एसी व कॅन्टींग साठी सातत्याने पाठपुरावा पालकमंत्री रविंद्र चव्हाण,खा.नारायण राणे,आमदार वैभव नाईक ,आ.नितेश राणे, आणि जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे केला होता. त्यामुळे तब्बल ४७ लाखाचा निधी मंजूर झाला असून कामे पूर्णत्वास जात आहेत. जिल्हा नियोजन अधिकारी श्री. बुधावळे व श्री. पवार व बांधकाम कार्यकारी अभियंता सर्वगोड यांचेही चांगले सहकार्य मिळाले.जिल्हा नियोजन मधून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री रविंद्र चव्हाण,खा.नारायण राणे ,शिक्षण मंत्री दीपक केसरकर,माजी खा.विनायक राऊत ,आमदार वैभव नाईक ,आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचे जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आभार मानत असल्याचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरस्कर यांनी सांगितले.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा