You are currently viewing कै. आप्पासाहेब गोगटे स्मृतीचषक २०२३ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जय हनुमान ठाणे विजेता तर नवभारत शिरोळ उपविजेता

कै. आप्पासाहेब गोगटे स्मृतीचषक २०२३ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जय हनुमान ठाणे विजेता तर नवभारत शिरोळ उपविजेता

देवगड

जामसंडे येथील जामसंडे सन्मित्र मंडळ आयोजित माजी आमदार कै. आप्पासाहेब गोगटे स्मृतीचषक २०२३ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत जय हनुमान ठाणे विजेता, नवभारत शिरोळ उपविजेता ठरला जिल्हास्तरीय कबड्डी पुरुष गट श्री भवानी सावंतवाडी विजेता सिंधुपुत्र कोळोशी उपविजेता,व महिला कबड्डी गटात एस.एम.सिंधु कुडाळ विजेते हॉलिक्रॉस सावंतवाडी उपविजेते ठरले राज्यस्तरीय कबड्डी विजेत्या संघांना प्रथम क्रमांक रोख रु ३५ हजार,व आकर्षक चषक,द्वितीय रोख रु २५ हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.तर जिल्हास्तरीत कबड्डी विजेत्यांना महिला व पुरुष गटातील विजेत्या प्रथम क्रमांक रोख रु १० हजार व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक रोख रु ७ हजार व आकर्षक चषक
कुस्ती अष्टपैलू खेळाडू प्रदीप कुमार रासम कणकवली याना गदा देऊन गौरविण्यात आले.

निवडण्यात आले जामसंडे सन्मित्र मंडळ, जामसंडे यांच्या वतीने राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष खुलागट कबड़ी स्पर्धा, जिल्हास्तरीय निमंत्रित पुरुष व महिला खुलागट कबड्डी स्पर्धा, जिल्हास्तरीय निमंत्रित हॉलीबॉल स्पर्धा व जिल्हास्तरीय निमंत्रित कॅरम स्पर्धाचे उदघाटन
-माजी आमदार अजित गोगटे, अग्नीवर रेणुका राणे,छोट्या बयोची मोठी गोष्ट फेम रुची नेरुरकर पूर्वा केतकर,एमा कुळकर्णी, सायली घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.तर स्पर्धेचा बक्षीस समारंभ आम.नितेश राणे,माजी आमदार अजित गोगटे,भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे,
या वेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस,अर्बन बँक संचालक अभिषेक गोगटे,महादेव आचरेकर चेअरमन प्रकाश गोगटे,यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यावेळी सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष राजा भुजबळ सचिव चंद्रकांत पाटकर ,माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,युवा मोर्चा अध्यक्ष अमित साटम भाजप गटनेते शरद ठुकरुल,नगरसेविका प्रणाली माने,नगरसेविका तन्वी चांदोस्कर,ऋचाली पाटकर,आद्या गुमास्ते,मनीषा जामसंडेकर भाजप तालुका अध्यक्ष संतोष किंजवडेकर,माजी सभापती सुनील पारकर ,खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष रवींद्र तिरलोटकर,संचालक संतोष फाटक, मंगेश लोके,राजू शेट्ये , दयानंद पाटील,उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचा शाल श्रीफळ विवेकानंद स्वामी यांचे पुस्तक भेट देऊन करण्यात आला क्रीडा महोत्सवातील स्पर्धेचा निकाल या प्रमाणे जाहीर करण्यात आला.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा तृतीय चतुर्थ क्रमांक उपांत्य फेरीतील पराभूत संघ अमर हिंद व गोल्फा देवी मुंबई रोख रु ५ हजार,
अष्टपैलू खेळाडू रोख रु ३हजार नदीम शेख शिरोळ (कोल्हापूर)
उत्कृष्ट चढाई अमरहिंद मुंबई,उत्कृष्ठ पकड गौरव भोसले जयहनुमान ठाणे,याना रोख १ हजार देऊन गौरविण्यात आले.
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा महिला गट तृतीय व चतुर्थ क्रमांक प्रत्येकी रोख रु २ हजार जय गणेश मालवण,व शुभम स्पोर्ट्स देवगड याना देण्यात आले.अष्टपैलू खेळाडू कोमल रणसिंग कुडाळ,रू १ हजार,उत्कृष्ट चढाई,रु ५००/- अलिष्का अलमेडा, सावंतवाडी, उत्कृष्ट पकड हर्षदा राऊळ कुडाळ,शिस्तबद्ध संघ मानसिश्वर वेंगुर्ला याना देण्यात आला.

जिल्हास्तरीय पुरुष गट तृतीय व चतुर्थ क्रमांक रोख रु २हजार आकर्षक चषक यंगस्टार कणकवली, लक्ष्मीनारायण वालावल,शिस्तबद्ध संघ रु १ हजार स्थानेश्वर किंजवडे,अष्टपैलू खेळाडू रु १ हजार व सन्मान चिन्ह वेदांत शिवभवानी सावंतवाडी ,उत्कृष्ठ चढाई रु ५०० सन्मान चिन्ह,,धुळाजी खरात कोळोशी उत्कृष्ठ पकड योगेश घाडी लक्ष्मीनारायण वालावल, याना निवडण्यात आले.,

निमंत्रित कुस्ती स्पर्धा निकाल ४० खाली किलो अनुक्रमे १ ते ४ विजेते तेजस पारकर फोंडा,आर्यन धुवाळी देवगड,अंनमत शेख करूळ,करणं धुरी देवगड,४७ किलो खाली साईल परब,देवगड,रुपेश चव्हाण करूळ,कार्तिक धुवाळी देवगड,श्लोक मर्ये कणकवली,
५४ किलो खाली तेजसराज दळवी सावंतवाडी, सोनू जाधव कासाडे, अजिंक्य पोकळे कणकवली, हर्ष कानडे करूळ,६० किलो खाली भूषण तोरस्कर, फोंडा रोहित राठोड तुषार जाधव बाळू जाधव,कासाडे,,
६८ किलो खाली नागेश सावंत कणकवली, गजानन माने कासारडे, दिव्येश फाळके देवगड,देवन डिसोझा वेंगुर्ला,७५ किलो खाली नित्यानंद वेंगुर्लेकर,वेंगुर्ला,मृणाल मुणगेकर कासारडे,कुणाल परब सावंतवाडी,सुरेश पाटील फोंडा,
७५ किलो वरील प्रदीपकुमार रासम कणकवली,संदेश रेडकर वेंगुर्ला ,शुभम सावंत कणकवली,कौस्तुभ नाईक सावंतवाडी असे अनुक्रमे १ते ४ विजेते ठरले.या स्पर्धेच्या निमित्ताने प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येऊन कपाट, सायकल खुर्ची एलईडी चे विजेते निवडण्यात आले.:

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =