You are currently viewing मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा बँकेचा समावेश…

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात जिल्हा बँकेचा समावेश…

गरजूंनी सिंधू उद्योग कक्षाशी संपर्क साधावा; मनिष दळवींचे आवाहन…

सिंधुदुर्गनगरी

सुशिक्षित व बेरोजगार युवक युवतींना उद्योग व्यवसाय क्षेत्रात संधी देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत संबंधित लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे त्याचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी “सिंधू उद्योग कक्षाशी” संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.

राज्यातील युवक, युवतींना आत्मनिर्भर बनवण्याचे उद्दिष्ट असून योजनेचा लाभ जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी घेऊ शकतात. यामध्ये लाभार्थींचे वय १८ ते ४५ पर्यंत असणे आवश्यक असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती महिला, अपंग, माजी सैनिक यांच्यासाठी वयाची अधिकतम मर्यादा पाच वर्ष शितल राहील. सीएमईजीपी पात्र उद्योग/ व्यवसाया करिता प्रकल्प किंमत कमाल मर्यादा ही सेवा उद्योग तसेच कृषी पूरक उद्योग /व्यवसायासाठी रुपये २० लाख व उत्पादन प्रकारच्या प्रकल्पासाठी प्रकल्प किंमत मर्यादा रूपये ५० लाख आहे. या योजने अंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त व भटक्या जमाती, अल्पसंख्यांक तसेच उर्वरित प्रवर्ग यांच्यासाठी अनुक्रमे शहरी भागासाठी २५% /१५% तर ग्रामीण भागासाठी अनुक्रमे ३५%/ २५% शासनाकडून अनुदान मिळू शकेल.ज्या सुशिक्षित बेरोजगारांना सदर योजनेमध्ये लाभ घेऊन उद्योग व्यवसाय चालू करावयाचे आहेत त्यांनी जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्ग नगरी येथील प्रधान कार्यालयाच्या “सिंधू उद्योग कक्षाशी” संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा