You are currently viewing श्री सदगुरू भक्त सेवा न्यास तर्फे जिल्हा रुग्णालयात पीपीई किट वाटप…

श्री सदगुरू भक्त सेवा न्यास तर्फे जिल्हा रुग्णालयात पीपीई किट वाटप…

सिंधुदुर्ग

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात श्री श्री108 महंत मठाधिश परमपूज्य सद्गुरू श्री गावडेकाका महाराज संचालित श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी ही संस्था मदतकार्यात अग्रेसर आहे. मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, गरजूंना अन्नधान्य वाटप, पोलीस बांधवाना नाश्ता आणि लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या प्रवाशांना जेवणाची सोय, पंतप्रधान सहायता निधी तसेच मुख्यमंत्री निधी मध्ये आर्थिक मदत गणेश चतुर्थित गरजुना पुजा साहीत्य व धान्य वाटपअश्या निरनिराळ्या प्रकारचे मदतकार्य संस्थेने केले आहे. आज देखील जिल्हा रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या आपल्या परिचारिका डाँव्टर,आणि रुग्ण सेवक बांधवांच्या आरोग्याची काळजी घेता यावी या उद्देशाने त्यांच्या साठी पीपीई किटचे वाटप संस्थेच्या वतीने करण्यात आले. त्या वेळी संस्थेचे विद्यमान अध्यश दत्ताञय किनळेकर, खजिनदार पंकज कामत, सचिव राकेश केसरकर, बंड्या सावंत, डॉ श्रीपाद पाटील डाँ राजेद्र केळकर उपस्थित हाेते. जिल्हा शल्य चिकित्सक सिधुदुर्ग डाँ…श्रीमंत चव्हाण यांच्या कडे पीपीई किट सुपुर्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 14 =