– उदय सामंत
मुंबई
विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देतानाच मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संदर्भातील विविध प्रश्न तात्काळ सोडविले जातील, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
श्री. सामंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्पोर्ट पॅव्हेलियनला भेट देऊन विकासात्मक कामांची पाहणी केली. मुंबई शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या पॅव्हेलियनचा विकास होणे आवश्यक असून या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या खेळातील कौशल्याला चालना मिळेल. क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी या ठिकाणाचा विकास होणे गरजेचे आहे त्यासाठी लागणारे सहकार्य विद्यापीठ प्रशासनाला केले जाईल, असे श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
यावेळी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर व सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.