You are currently viewing बांधकाम कामगारांनी वितरण कार्डव्दारे भोजन सेवेचा लाभा घ्यावा

बांधकाम कामगारांनी वितरण कार्डव्दारे भोजन सेवेचा लाभा घ्यावा

बांधकाम कामगारांनी वितरण कार्डव्दारे भोजन सेवेचा लाभा घ्यावा

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यातील सर्व बांधकाम कामगारांना 1 जुलै 2023 पासून केवळ नोंदीत सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना भोजन वितरण कार्ड (RF Based)  चा वापर करुन भोजन विरतण करण्यात येणार आहे, याचा लाभ कामगारांनी घ्यावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

             जिल्ह्यामध्ये मार्च 2023 पासून नोंदीत तसेच अनोंदीत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत में. इंडो अलाईड प्रोटीन फूड्स.प्रा.लि या एजन्सीव्दारे दुपारचे तसेच रात्रीचे जेवण पुरविण्यात येत आहे. परंतु शासनाच्या दि. 4 मे 2023 अन्वये दिलेल्या सूचनांनुसार मध्यान्ह भोजन वितरीत करताना भोजन वितरण कार्ड (RF Based) चा वापर करवा असे कळविले आहे. वरील निर्देशित केल्यानुसार मंडळामध्ये नोंदीत सोबतच अनोंदीत बांधकाम कामगारांना दि. 30 जून 2023 पर्यंतच मध्यान्ह भोजन व रात्रीचे भोजन पुरविण्यात येणार असून त्यानंतर मध्यान्ह भोजन व रात्रीचे भोजन अनोंदीत बांधकाम कामगारांना वितरीत केले जाणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा