15 जून, जेष्ट नागरिक छळ अन पिळवणूक प्रतिबंध जागृती दिवस साजरा
कणकवली
जेष्ट नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्ध।पकाल चांगल्या तऱ्हेने घालविता यावा,समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे,शारीरिक मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे,त्यांच्या आर्थिक क्षमता,कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क अन सार्वजनिक मदत मिळविणेसाठी राज्य शासनाने जेष्ट नागरिक धोरण ठरवून दिनांक 9 जुलै 2018 अन्वये शासन निर्णय पारीत केला
गृह विभागाने पर्यायाने पोलीस खात्याने जेष्ट नागरिक सभा घेऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करावे,कायद्याबाबत प्रबोधन करून त्यांना आश्वासीत करावे असे अभिप्रेत आहे,याबाबत जील्ह्यातील संबंधित खात्यांना सजग केलेप्रमाणे सर्वत्र पोलीस विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुका स्तरावर सभेचे नियोजन करणेत आले
कणकवली तालुक्यात जेष्ट नागरिक सभेचे आयोजन येथील पेन्शनर भवन येथे दिनांक 15 जून 25 रोजी सकाळी 11 ते 12 पर्यंत श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे अध्यक्षते खाली संपन्न झाले,यावेळी श्री अनिल हडळ पोलिस उपनिरीक्षक कणकवली श्री शिवगण पोलिस अधिकारी यांनी जेष्ट नागरिकांना आपत्कालीन प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पोलीस हेल्पलाईन 7036606060 अन अन्य हेल्पलाईन चा समयोचित वापर करणेची सूचित केले तसेच पोलीस यंत्रणा जेष्ठांची अन जनतेची सुरक्षितता अन अन्य प्रश्न।बाबत जिल्ह्यात सर्वत्र कशी कार्यरत आहे असे सांगून यथोचित मार्गदर्शन केले,यानंतर जेष्ठांच्या सर्व शंकांचे उत्तरे देऊन निराकरण करणेत आले,अध्यक्ष श्री सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी पोलिसांनी सन्मानपूर्वक वागणूक देऊन पोलीसानी जेष्ट नागरिकांवर मैत्रीपूर्ण लक्ष ठेऊन महिन्यातून किमान एकदा एकाकी, अशक्त जेष्ट नागरिकाना सदिच्छा भेट द्यावी,आणीबाणीच्या वेळी तात्काळ आरोग्यविषयक सूचना तथा सुरक्षाविषयक मदत उपलब्ध करणेबाबत सहकार्य करावे असे सूचित केले,
शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी होत असलेबाबत पालकमंत्री मा नितेशजी राणे, जिल्हा धिकारी श्री अनिल पाटील,नूतन सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक श्री दहिकर, अति पो अधीक्षक श्री कृषीकेश रावले अन कणकवली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप,श्री अनिल हडळ,श्री शिवगण अन पोलीस विभाग,समाज कल्याण अधिकारी,सिंधुदुर्ग श्री चिकने यांचे आभार मानणेत आले,
यावेळी जेष्ट नागरिक संघ,पेन्शनर असो कणकवली सर्वश्री सखाराम सपकाळ(जिल्हा सचिव) प्रमोद लिमये अन विलास चव्हाण (तालुका सचिव) से नि उपनिरीक्षक श्री राणे,श्री मोहन सावंत,श्री कृष्णा दळवी,श्री भोजे,श्री पाटकर,श्री गोविंद स।ळकर, सौ गौरी स।ळकर,रीमा भोसले,सुरेखा महाजन, प्रियांका दळवी, चंद्रकांत पाताडे,महादेव चव्हाण अन अन्य सदस्य उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*
👗👗👗👗👗👗👗👗👗
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
दहावी बारावी नंतर काय करायचे!!…
घडवा तुमचे करियर तुमच्या आवडत्या क्षेत्रात…
*प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू ! प्रवेश सुरू*
*𝙳𝚒𝚙𝚕𝚘𝚖𝚊 𝚒𝚗 𝚃𝚎𝚡𝚝𝚒𝚕𝚎 & Fashion Designing*
आजच प्रवेश निश्चित करा.
(SNDT विद्यापीठ, मुंबई मान्यताप्राप्त अभ्यासक्रम)
*🔸कालावधी :- २ वर्षे*
*🔸 प्रथम वर्षाकरीता प्रवेश पात्रता :-
१० व १२ वी परीक्षा उत्तीर्ण.*
🔸 *वैशिष्ट्ये :-*
✅ तज्ञ व अनुभवी अध्यापक वर्ग.
✅ अद्ययावत फॅशन व टेक्स्टाईल लॅब.
✅ फॅशन इंडस्ट्रीतील नामांकित कंपन्यांमध्ये क्षेत्र भेटी.
✅ सर्व सोयींनी युक्त वसतिगृह व मेस सुविधा उपलब्ध.
✅ डिप्लोमा नंतर डिग्री अभ्यासक्रमास प्रवेशास पात्र.
✅ नामांकित फॅशन कंपन्या मध्ये नोकरीच्या अधिक संधी अथवा स्वतःचा स्टार्टअप व्यवसायास उपयुक्त.
*संपर्क:*
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*,
*अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क करावा:*
*📱 7972997567
कृपया पुढील Google form भरावा :
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfwnE0gpLfPz2957rmmXllkrueZdpzXE5f0MKnJejNwJikRKg/viewform?usp=header
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/171794/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*