You are currently viewing २६ डिसेंबर रोजी शेर्ले श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

२६ डिसेंबर रोजी शेर्ले श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव

सावंतवाडी :

 

शेर्ले येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव दि. २६ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळपासून देवीची ओटी भरणे, नवस बोलणे-फेडणे, रात्रो देवीची पालखीतून मिरवणूक, त्यानंतर आजगावकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शेर्ले देवस्थान समिती व ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा