You are currently viewing दिशा फाउंडेशनतर्फे कास गावातील शाळेत डॉ. अनघा बांद्रे यांचे ‘गुड टच, बॅड टच’बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

दिशा फाउंडेशनतर्फे कास गावातील शाळेत डॉ. अनघा बांद्रे यांचे ‘गुड टच, बॅड टच’बद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

बांदा

मुला-मुलींमध्ये कार्यक्रम व उपक्रमांद्वारे चांगला स्पर्श किंवा वाइट स्पर्शाविषयी (गुड टच, बॅड टच) जागृती करणे आवश्यक बनले आहे. त्याचबरोबर मुला-मुलींमध्ये आत्मविश्वास वाढावा, स्वतःच्या हक्काची व कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी यादृष्टीने कामत चॅरिटेबल ट्रस्ट, दिशा फाउंडेशन कास यांनी गुड टच, बॅड टच संदर्भात मार्गदर्शनपर उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचे उदगार १०८ च्या डॉ. अनघा बांद्रे यांनी काढले.

कामत चॅरिटेबल ट्रस्ट, दिशा फाउंडेशन कास यांच्यावतीने शाळा कास नंबर १ मधील मुलांना १०८ रुग्णवाहिका व गुड टच, बॅडच यासंबधीचे मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी दिशा फाउंडेशनच्या अध्यक्षा मंगल कामत, मुख्याध्यापिका नाईक, शिक्षक श्री. पालव, श्री.गावडे आदि सर्व शिक्षक उपस्थित होते. डॉ. अनघा बांद्रे यांनी, मुलींना १०८ ला फोन कसा करावा, त्या अद्ययावत १०८ मध्ये कोणकोणती उपकरणे असतात त्या विषयी माहिती दिली.

अध्यक्षा मंगल कामत म्हणाल्या की, सर्व शाळांमध्ये असे उपक्रम होणे गरजेचे आहे. इयत्ता चौथी ते आठवीच्या वर्गातील मुला-मुलींसाठी चांगला स्पर्श-वाईट स्पर्शाविषयी जागृती व्हावी. शारिरीक, मानसिक पीडा, लैंगिक शौषण यासारखे प्रसंग मुला-मुलींसोबत घडल्यास त्यांनी भीती न बाळगता याबाबत शिक्षक, पालक, मित्र-मैत्रिणी, विश्वासू व्यक्तींना माहिती द्यावी, यासाठी त्यांच्यात धैर्य निर्माण करण्यासाठी उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी मार्गदर्शनपर सांगितले. मुख्याध्यापिका नाईक यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा