You are currently viewing फळपीक विमा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्या

फळपीक विमा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्या

*फळपीक विमा हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्या*

*– भाजपा किसान मोर्चाची पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे मागणी*

*पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांचे समवेत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांचेशी किसान मोर्चा शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा* …

फळपीक विमा योजनेसाठी विमा रक्कम भरण्याची मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत आहे . मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकरी गतवर्षीच्या विमा लाभापासून वंचित आहेत . तसेच सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑनलाईन विमा ज्या साईटवर भरला जातो , ती साईट २४ नोव्हेंबर पासून आजतागायत बंद आहे . त्यामुळे चालु वर्षीचा विमा भरण्यास शेतकरी वंचित रहाणार आहेत .
म्हणून किमान १५ दिवसाची मुदतवाढ मिळावी , अशी मागणी भाजपा किसान मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचेकडे केली .
या मागणीची दखल घेत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे यांनी तात्काळ जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांचेशी चर्चा करून मुदतवाढीचा प्रस्ताव कृषी आयुक्तांना सादर करण्यास सांगीतला . तसेच मंत्रालय स्तरावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचेशी पालकमंत्री रविंद्र चव्हाण चर्चा करून मार्ग काढतील असे आश्वासित केले .
ओरस मुख्यालय या ठिकाणी झालेल्या चर्चेत किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , कोषाध्यक्ष चारुदत्त देसाई , माजी सभापती निलेश सामंत , मालवण किसान मोर्चाचे महेश सारंग उपस्थित होते

फळपीक विमा हप्ता भरण्यास मुदतवाढ मिळण्याकरीता पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी संतोष साखरे व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांचेशी चर्चा करताना किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , माजी सभापती निलेश सामंत .

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा