You are currently viewing शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले यांचा उपक्रम

वेंगुर्ले

बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय ,वेंगुर्ले यांचेमार्फत ग्रंथालय उपक्रमांतर्गत प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंतीचे औचित्य साधून शुक्रवार १७ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९-०० वाजता जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
वेंगुर्ले येथील ही स्पर्धा इयत्ता दहावीपर्यंतचा शालेय गट व खुला गट अशा दोन गटांमध्ये घेण्यात येणार आहे.
शालेय गटासाठी ‘राजमाता जिजाऊ:एक अलौकिक व्यक्तिमत्व’ व खुल्या गटासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक : स्वराज्याची गरज’ हे विषय आहेत.
शालेय गटासाठी किमान पाच ते कमाल सात मिनिटे व खुल्या गटासाठी किमान आठ ते कमाल दहा मिनिटे वेळ आहे.
शालेय गट प्रथम पारितोषिक रु.1000/-, द्वितीय रु. 750/- ,तृतीय रु.500/- व उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय प्रत्येकी रु300/-सर्वांना चषक व प्रमाणपत्र तसेच खुलागट प्रथम क्रमांक रु 1500/-, द्वितीय रु. 1100/-, तृतीय रु.750/- व उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय प्रत्येकी रुपये ५००/- व सर्वांना चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेत प्रवेश घेण्यासाठी श्री संजय पाटील मोबा.नं. (९८९०६९४७०९) व श्री सुनील आळवे मोबा.नं.(९४२१६३११४७) यांचेशी संपर्क साधावा. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्री विलास देऊलकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा