You are currently viewing ऑलिव्ह रिडले कासवांच्या ७५ पिल्लांना आचरा समुद्रात सोडले

ऑलिव्ह रिडले कासवांच्या ७५ पिल्लांना आचरा समुद्रात सोडले

मालवण

आचरा समुद्रकिनारी कासवमित्रांनी संवर्धन केलेल्या घरट्यातून बाहेर आलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाच्या पिल्लांना वनविभाग अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी सुर्यकांत आबा धुरी यांनी सरकारी नियमाप्रमाणे कासवांच्या अंड्यांचे संवर्धन करत मंगळवारी ५१ दिवसानी त्या अंड्यांपासुन बाहेर पडलेल्या ७५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले आहे.

आचरा पिरावाडी येथील समुद्र किनाऱ्यावर 2 महिन्यापूर्वी ऑलिव्ह रिडले कासवांची अंडी सापडून आली होती.यावेळी वनविभागाचे संजू जाधव, आचरा ग्रामपंचायत सदस्य मुज्जफर मुजावर, शरद धुरी, अजय कोयंडे, जीतेंद्र धुरी, ममता मुळेकर, गणधाली धुरी, गायत्री वाडेकर, स्वप्नील जोशी, नंदू तळवडकर, शुभ्रा धुरी, तृप्ती धुरी, सृष्टी धुरी, चंदना धुरी पिरावाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 5 =