अभिनेता सुशांत सिंह याच्या हत्येमागे आदित्य ठाकरेंचा हात : नारायण राणे

अभिनेता सुशांत सिंह याच्या हत्येमागे आदित्य ठाकरेंचा हात : नारायण राणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या टीकेला उत्तर देत भाजपचे खासदार नारायण राणे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. अभिनेता सुशांत सिंह याच्या हत्येमागे आदित्य ठाकरेंचा हात आहे, असा थेट आरोप नारायण राणे यांनी केला आहे. सुशांत सिंह आणि दिशा सॅलियन यांच्या हत्येबाबत सीबीआयचा तपास अजून पूर्ण व्हायचा आहे, त्याआधीच उद्धव ठाकरेंनी आपल्या मुलाला क्लीन चीट देऊन टाकली, असा आरोपही त्यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका कराल तर जशास तसे उत्तर देणार असा इशारा नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. कोरोना, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर बोलण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी निर्बुद्ध भाषण केल्याची टीका त्यांनी केली.

उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षण विरोधी आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा फक्त आदित्य ठाकरेंना क्लीन चीट देण्यासाठी होता,त जनतेसाठी नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. शिवसेनेचे ५३ आमदार मोदींच्या नावामुळे आले. यापुढच्या निवडणुकीत शिवसेनेचे फक्त जेमतेम १० ते १५ आमदार निवडून येणार असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. जीएसटीबबाच उद्धव ठाकरेंना काही कळत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा