You are currently viewing सावंतवाडीतील प्रसिद्ध डॉक्टर चंद्रकांत जेवरे यांचे निवासस्थानी निधन.. 

सावंतवाडीतील प्रसिद्ध डॉक्टर चंद्रकांत जेवरे यांचे निवासस्थानी निधन.. 

सावंतवाडी :

 

सावंतवाडीतील प्रसिद्ध डॉक्टर चंद्रकांत जेवरे यांचे आज रात्री दहा वाजता माजगाव पंचम नगर मधील निवासस्थानी निधन झाले. ते ८५ वर्षाचे होते. उद्या त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार होणार आहे. गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज रात्री दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सूना, नातवंडे, असा परिवार आहे.

मूळ कर्जतचे असलेले डॉ. जेवरे यांनी सावंतवाडीतील कुटीर रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम केले होते. त्यानंतर गोरगरिबांची सेवा करता यावी यासाठी त्यांनी शासकीय नोकरी सोडून स्वतः खाजगी सेवा देण्यास सुरुवात केली. सर्व सामान्यांसाठी ते देवदूत होते. सावंतवाडीत त्यांनी सर्जन म्हणून काम केले. एक रुपयापासून पासून त्यांनी उत्तम सेवा बजावली. त्यांनी आपल्या काळात हजारो शस्त्रक्रिया केल्या. योग्य निदान करण्यासाठी सुद्धा ते प्रसिद्ध होते. भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयात त्यांनी संचालक म्हणून अनेक वर्ष काम केले. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × two =