You are currently viewing सावंतवाडीत हॉटेल पॉम्पस समोर मटक्याची समृद्धी आणण्यासाठी उभा राहतोय नगरसेविकेचा अनधिकृत स्टॉल…

सावंतवाडीत हॉटेल पॉम्पस समोर मटक्याची समृद्धी आणण्यासाठी उभा राहतोय नगरसेविकेचा अनधिकृत स्टॉल…

सावंतवाडीत मध्यंतरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अनधिकृत स्टॉल, टपऱ्या उठविण्यावरून रणकंदन माजले होते. भाजी मार्केटमधील कित्येकवर्षं पूर्वीचे स्टॉल नगराध्यक्षांनी स्वतः उभे राहत हटवून सावंतवाडी शहराच्या संत गाडगेबाबा भाजी मंडई आणि गवत मार्केटला मोकळा श्वास घ्यायला लावला होता. त्यावरून सत्ताधारी, विरोधक आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये द्वंद्व सुरू होते. नगरपलिकेवर मोर्चा देखील आला होता.
एवढे सर्व होऊन देखील सत्ता बदल झाल्यावर मटक्याची समृद्धी शहरात आणण्यासाठी सावंतवाडी नगरपलिकेतील एका नगरसेविकेने खासकीलवाड्यात खुद्द नगराध्यक्ष यांच्या वॉर्डात हॉटेल पॉम्पस समोर अनधिकृत स्टॉल उभा केला आहे. रात्रीच्यावेळी येऊन नगरसेविकेचे मटक्याच्या धंद्याशी संबंधित पती मुख्याधिकारी यांच्या परवानगीने स्टॉल उभारणीचे काम करत असल्याची माहिती बाजूच्या लोकांकडून देण्यात आली. नगराध्यक्षांच्या घरापासून २०० मीटरवर हायवे वर अनधिकृत स्टॉल उभा राहत असताना सावंतवाडीचा विकास करणारे नगराध्यक्ष त्याच्याकडे दुर्लक्ष का करतात?
गेल्या सहा महिन्यातील सावंतवाडी शहरात अनधिकृतपणे उभे राहिलेल्या टपऱ्यांची संख्या पाहिली असता सावंतवाडी टपऱ्यांचे होणार की काय अशी शंका सावंतवाडीकरांना येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 4 =