तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला येथे मनसेच्या वतीने घंटानाद आंदोलन…

तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला येथे मनसेच्या वतीने घंटानाद आंदोलन…

वेंगुर्ला

येथील मिशन अगेन बिगेन या माध्यमातुन सर्व हॉटेल, बार, रेस्टॉरंट व इतर गोष्टी पूर्ण क्षमतेने सुरू केल्या आहेत.पण त्यात सर्व धार्मिक स्थळे मंदिरे अजूनही बंद ठेवलेली आहेत, इतर गोष्टी चालु आहेत पण मंदिरे अजूनही का नाही चालु होत आहेत , धार्मिक स्थळे मंदिरे पूर्ण क्षमतेने सुरू करणे बाबत या राज्य सरकार ला जाग येण्यासाठी आज मनसे तालुका अध्यक्ष वेंगुर्ला सनी बागकर यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे तहसीलदार कार्यालय वेंगुर्ला येथे घंटा व टाळ वाजवुन आंदोलन करण्यात आले. तसेच येथील तहसीलदार लोकरे यांना या बाबत निवेदन देण्यात आले. यावेळी मनविसे उपजिल्हा अध्यक्ष परशुराम (आबा) परब, मनसे तालुका अध्यक्ष वेंगुर्ला सनी बागकर, तालुका सचिव राजाराम (आबा) चिपकर, उप तालुका अध्यक्ष विशाल माडये, शहर अध्यक्ष आमोद नरसूले, शाखा अध्यक्ष आरवली सोन्सुरा गंगाराम मातोंडकर, गोविंद मातोंडकर, गिरिधर घोगळे, राजन सारंग आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा