You are currently viewing दर्शन गडेकर व भूषण मालवणकर ‘खर्डेकर श्री‘चे मानकरी

दर्शन गडेकर व भूषण मालवणकर ‘खर्डेकर श्री‘चे मानकरी

वेंगुर्ला

बॅ.खर्डेकर महाविद्यालयात कै.काकासाहेब चमणकर स्मृतिप्रित्यर्थ जगदीश चमणकर पुरस्कृत किशोर सोन्सुरकर सातेरी व्यायामशाळा मार्गदर्शित आंतरवर्गीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सिनियर विभागात टीवायबीएचा विद्यार्थी दर्शन गडेकर तर ज्युनिअर विभागात अकरावी आर्टसचा विद्यार्थी भूषण मालवणकर हे ‘खर्डेकर श्री‘चे मानकरी ठरले.
येथील सिद्धिविनायक मगंगल कार्यालयात १ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन विद्यार्थी प्रतिनिधी प्रज्वल पालव याच्या हस्ते झाले. यावेळी माजी सभापती जयप्रकाश चमणकर, बी.के.सी.असोसिएशनचे संजय पुनाळेकर, प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, स्टाफ सेक्रेटरी प्रा.देवदास आरोलकर, किशोर सोन्सुरकर, अबोली सोन्सुरकर, सांस्कृतिक युवा महोत्सवाचे चेअरमन प्रा.डॉ.आनंद बांदेकर, बी.बी.जाधव, हेमंत गावडे, प्रा.संजिव चमणकर, सुरेंद्र चव्हाण, प्रा.विरेंद्र देसाई आदी उपस्थित होते.
शरीरसौष्ठव हे विद्यार्थ्यांना भूषण आहे. विद्यार्थी शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त राहिला पाहिजे असे मत जयप्रकाश चमणकर यांनी केले. विद्यार्थी व्यसनाधिकडे न वळता शरिरसौष्ठवकडे प्रवृत्त झाले आहेत. त्यामुळे भविष्यात शरिरसौष्ठव स्पर्धेत खर्डेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी मास्टर युनिवर्स बनेल असा आशावाद संजय पुनाळेकर यांनी व्यक्त केला.
शरीरसौष्ठव स्पर्धेत सिनियर गटात टीवायबीकॉमच्या बाळकृष्ण परबने द्वितीय, एफवायबीएच्या सुनिल काळेने तृतीय तर ज्युनियर गटात अकरावी एमसीव्हीसीच्या सिद्धांत पालकरने द्वितीय क्रमांक पटकाविला. पंच म्हणून किशोर सोन्सुरकर व सुधीर हळदणकर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक जे.वाय.नाईक यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 4 =