You are currently viewing शिरोमणी रविदास महाराज जयंती ५ फेब्रुवारीला  

शिरोमणी रविदास महाराज जयंती ५ फेब्रुवारीला  

कणकवली

चर्मकार समाजाच्यावतीने कणकवली येथे भव्य संत शिरोमणी रविदास महाराज जयंती ५ फेब्रुवारी ला मुंबई गोवा – हायवे उबाळे मेडिकल नजीक साजरी करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या काना – कोपऱ्यात असणाऱ्या चर्मकार समाजाने सहभागी व्हावं. हीच ती वेळ आहे समाज एकजुटीची, त्यामुळे समाज बांधवांनी या कार्यक्रमाला आवर्जुन उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कार्यक्रमाचे निमंत्रक विजय मुकुंद चव्हाण, सुजित प्रकाश जाधव, संजय सुभाष कदम, पंढरी महादेव चव्हाण यांनी सर्व समाज बांधवांना केले आवाहन.

संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने कणकवलीत सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा बौद्धविहार ते बाजारपेठ मार्गे कार्यक्रमास्थळी येऊन पोचणार आहे. त्यामुळे या शोभा यात्रेमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील समाज बांधवांनी सहभागी होणे आवश्यक आहे. शोभायात्रा कार्यक्रमास्थळी पोहोचल्यानंतर सकाळी ११ ते १ वा. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन, संत रविदास महाराजांचे आरती, स्वागत गीत, मान्यवरांचे स्वागत, मनोगत व्यक्त केले जाणार आहेत. तसेच प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांचे व्याख्यान देखील जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आले आहे.

दुपारी स्नेह भोजनाचा कार्यक्रम ३ ते ५ वा. पर्यंत ठेवण्यात आला आहे. तर महिलांसाठी खास कार्यक्रम खेळ पैठणीचा या कार्यक्रमाची सुद्धा मेजवानी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी वेळ न दवडता या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहायचे आहे.

चंद्रसेन पाताडे, राजेंद्र चव्हाण, अँड विराज भोसले, प्रकाश वाघेरकर ,डॉ प्रदीप बाबार्डेकर, भारत पेंढुरकर, प्रसाद मसुरकर, नामदेव जाधव, विठ्ठल चव्हाण, अंकुश चव्हाण, महेंद्र चव्हाण, अनिल जाधव, सी आर चव्हाण, आनंद जाधव, मानसी चव्हाण, मयुरी चव्हाण, या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक म्हणून उपस्थित असणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा