You are currently viewing एक्साइस ऑफिस बांदा येथे अवैध्य दारू वाहतुकीच्या विरोधात मनसेची धडक

एक्साइस ऑफिस बांदा येथे अवैध्य दारू वाहतुकीच्या विरोधात मनसेची धडक

*एक्साइस ऑफिस बांदा येथे अवैध्य दारू वाहतुकीच्या विरोधात मनसेची धडक*

बांदा

सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळीकडेच गोवा बनावटीच्या विषारी दारूचा सुळसुळाट चालू आहे. आजची युवा पिढी या स्वस्त मिळणाऱ्या दारूमुळे मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. त्याच प्रमाणे कमी श्रमात जास्त पैसा मिळत असल्याने अवैध्य दारू व्यवसाय करणारे या आजच्या तरुण पिढी व विद्यार्थ्यांना वाहने तसेच खर्चाला पैसा देत या धंद्यात ओढत आहे तसेच या गोष्टीचा खूप वाईट परिणाम आजच्या युवा पिढीवर होत आहे. आजची युवा पिढी व्यसनाधीन होत असल्याने त्यांच्या पालकांवर सुद्धा आपल्या मुलांची व्यसनाधीनता पाहण्याशिवाय काहीच पर्याय राहिला नाही.

गेल्या वर्षी याच एक्साइस ऑफिस वर या दारू धांद्याविरोधात डबे वाजवा आंदोलनाचा इशारा दिल्या नंतर मोठ्या प्रमाणात मोठ मोठ्या गाड्यातून होणारी दारू वाहतूक पकडून त्यावर कारवाई करण्यात आली. या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या दारू वाहतुकीवर कारवाई झाल्याचे दिसून येते पण या मोठ्या कारवाया करीत असताना जी आज गावागावातून व शहरातून चोरटी दारू आणून विकली जाते त्याच्यावर मात्र कोठेही कारवाई होताना दिसत नाही. मोठ्या कारवाया तुम्ही कराच पण त्याचबरोबर चारचाकी व दुचाकी गाड्यावरून होणारी या गोवा बनावटीची विषारी दारू वाहतूक रोखून आज आपली जी युवा पिढी व्यसनाधीन होत आहे त्याला वेळीच आवर घालण गरजेचं आहे.
तरी आज गावागावातून तसेच शहरातील चालणारा दारू व्यवसायाबाबत एक्साईज ऑफिस, पोलीस खाते , गावातील पोलीस पाटील, दक्षता समिती यांनी एकत्र येऊन या अवैध्य धंद्यांचा वेळीच बंदोबस्त करून युवा पिढीला तसेच विद्यार्थ्यांना व्यसनाधीन व वाममार्गाला जाण्यापासून वाचवावे व यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे त्यासाठी मनसेचे पदाधिकारी आपल्याला सहकार्य करतील अशी ग्वाही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच आपण कारवाईत सातत्य दाखवा व चुकीच्या पद्धतीने होणारी वाहतूक थांबवा अन्यथा गावागावात तसेच शहरात चालणाऱ्या या अवैध्य दारू धांद्या विरोधात मनसेला आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडाव लागेल असा इशारा उपस्थित मनसैनिकानी दिला. तर वेळीच योग्य ती कारवाई करू व चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या वाहतुकीला आळा घालू असे आश्वासन उपस्थित एक्साइज अधिकाऱ्याने मनसे शिष्टमंडळाला दिला. यावेळी
मनसे विद्यार्थीसेना जिल्हाअध्यक्ष आशिष सुभेदार माजी विभाग अध्यक्ष मंदार नाईक माजी विभाग अध्यक्ष नाना सावंत बांदा माजी शहराध्यक्ष बाळा बहिरे विजय जांभळे मा शाखा अध्यक्ष सुरेंद्र कोठावळे ग्रा.प सदस्य आदेश सावंत विद्यार्थीसेना जिल्हासचिव निलेश देसाई विद्यार्थीसेना शहराध्यक्ष स्वप्निल जाधव रघुनाथ खोटलेकर गिरगोल दिया विद्यार्थीसेना तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नाईक रुपेश गुळेकर सुनील नाईक पंकज देसाई आदी उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा