You are currently viewing कणकवली येथे लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

कणकवली येथे लहान मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

समानवता ट्रस्ट व संजीवनी हॉस्पिटल कणकवलीचा उपक्रम

कणकवली

हर्निया, हायड्रोसील, अनडिसेंडेड टेस्टीस व सरकमसिजन (सुन्ताचे ऑपरेशन) अशा अॅापरेशनला १५,०००/- ते २५,०००/-रुपये खर्च येणाऱ्या शस्त्रक्रिया समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग व संजीवनी हॉस्पिटल कणकवली यांच्या मार्फत मोफत होणार आहेत. या अनुषंगाने तपासणी शिबिर सोमवार 6 फेब्रुवारी 2023 रोजी संजीवनी हॉस्पिटल कणकवली येथे सकाळी ९ ते सकाळी ११ या वेळेत आयोजित केलेले आहे.

सदर तपासणी शिबिर व होणाऱ्या शस्त्रक्रियाही पूर्णपणे मोफत आहेत. सदरच्या शस्त्रक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांसमवेत मुंबईतील प्रसिद्ध बाल शल्यचिकीत्सक डॉ. राजीव रेडकर यांच्याकडून होणार आहेत. सदर मोफत तपासणी शिबिर व मोफत शस्त्रक्रिया यांचा लाभ सिंधुदुर्गवासियांनी घ्यावा असे आवाहन समानवता ट्रस्टचे सचिव कमलेश गोसावी आणि संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर तायशेटे यांनी केले आहे. सदर शिबिरासाठी 9421237887 या क्रमांकावर नोंदणी करावी.
दिवसेंदिवस अनेक आजारांचे प्रमाण मोठ्याप्रमाणे लहान मुलांमध्येही अधिक प्रमाणात दिसत आहे. अज्ञान व आर्थिक परिस्थितीमुळे तपासणी आणि उपचार न करण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यातील व्याधीग्रस्त मुलांना चांगले उपचार मिळावेत म्हणून या शिबिराचे आयोजन केलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा