*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गझलकार जयराम धोंगडे लिखित अप्रतिम गझल*
*आरसा*
वारसा मी आरशाचा पाळतो,
पाहतो पण बोलण्याचे टाळतो!
नावडे कोणास काही जे खरे,
दे करू ते ज्यामुळे चेकाळतो!
दावतो बघ आरसा आहे तसे,
वावगे मुद्दाम का फेटाळतो?
आवडे वाखाणणी मोठेपणा,
सोंगढोंगावर जमाना भाळतो!
केवढा खोटेपणा बोकाळला,
पान सत्याचे कुठे ते चाळतो!
*जयराम धोंगडे*