You are currently viewing प्राजक्त

प्राजक्त

जागतिक मराठी साहित्य व्यक्ती विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक, कवी प्रा.डॉ.जी आर उर्फ प्रवीण जोशी यांची काव्यरचना

येशील का तु त्या वृंदावनी
सुर बासुरी त्या सायंकाळी

किती बहरले किती बहकले
क्षणाक्षणानी खास भारले
वाटे भेट ती पहिले वहिले
गुंज उठे त्या मधुबन वेळीं

सडा भरभरुनी प्राजक्ताचा
रिता झाला सुगंध ओंजळीचा
विरण्या तो क्षण स्व कस्तुरीचा
घननीळ अवतरला सायंकाळी

सरली वेळ ती सरला काळ
गत स्मृतीं ची बांधुन माळ
गत काळाची पायी चाळ
अधीर मेघ तो अधीर वेळी

प्रो डॉ प्रवीण( जी आर )जोशी
अंकली बेळगांव
कॉपी राईट

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 15 =