You are currently viewing कोकण शिक्षक मतदार संघात देवगड तालुक्यात ९८ टक्के मतदान

कोकण शिक्षक मतदार संघात देवगड तालुक्यात ९८ टक्के मतदान

देवगड

कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आज देवगड तालुक्यात २५० मतदारांपैकी २४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने देवगड तालुक्यात ९८ टक्के एवढे मतदान झाले.

कोकण विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणुकी करता आज मतदान झाले. या निवडणुकीत शिंदे गट भाजपा युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे व महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. आज सकाळी या निवडणुकीच्या मतदानाला प्रारंभ झाला. देवगड तालुक्यात एकूण २५० मतदार असून त्यामधील २४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला . या निवडणुकीसाठी तीन मतदार केंद्रे ठेवण्यात आली होती. देवगड तहसीलदार कार्यालयातील केंद्रावर एकूण १६९ मतदारांची नोंदणी होती त्यापैकी १६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर मिठबाव मतदान केंद्रावर २५ पैकी २५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आणि पडेल मतदान केंद्रावर ५६ पैकी ५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला एकूण ९८.२१% टक्के मतदान झाले.. देवगड तालुक्यात अत्यंत शांततेत मतदान पार पडले देवगड पोलीस व विजयदुर्ग पोलीस यांनी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा