मृद आरोग्य पत्रिका आधारित खत वापर प्रशिक्षण….

मृद आरोग्य पत्रिका आधारित खत वापर प्रशिक्षण….

मालवण :

 

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत मालवण तालुका शिरवंडे येथे मृद आरोग्य पत्रिका आधारित खत वापर कसा करावा, याबाबत शेतकऱ्यांना दिलेल्या प्रशिक्षणास उत्तम प्रतिसाद मिळाला.

 

या प्रशिक्षण कार्यक्रमाला डॉ. विजय पळसांडे, कृषी मंडळ अधिकारी ए. आर. कांबळे, शिरवंडे सरपंच संतोष लाड, कृषी पर्यवेक्षक सचिन गवंडे, व्ही. सी. चौधरी, तंटामुक्त अध्यक्ष उत्तम गावकर, मयुरी गावकर, शेतकरी व महिला बचत गट आदी उपस्थित होते.

 

यावेळी शेतकऱ्यांना प्रशिक्षणात मातीचे नमुने काढणे, त्या मातीची तपासणी करणे, मृद आरोग्य पत्रिकेचे महत्त्व व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल पूर्ण सविस्तर माहिती व मार्गदर्शन डॉ. पळसांडे यांनी केले. मृद आरोग्य पत्रिका आधारित खताचा वापर करण्याबाबतचे प्रात्यक्षिक प्रक्षेत्रही उपस्थित असलेले सर्वांना दाखविण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सरपंच संतोष लांडे यांनी ‘शेतकऱ्यांमध्ये जनजागृती होऊन व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक पद्धतीने शेतकरी आपली प्रगती करतील’, असा विश्वास व्यक्त केला आहे. या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक कृषी अधिकारी ए.आर. कांबळे यांनी केले. तसेच या कृषी प्रशिक्षणासाठी गावकर यांनी  कृषी विभागाचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा