हळुवारपणे तुझं ते स्पर्शातून बोलणं…

हळुवारपणे तुझं ते स्पर्शातून बोलणं…

स्पर्शही तनाला
परका जाहला…

रोखलेला तुझा तो
नजरेचा बाण,,,
भेदूनी मनाला
मोकळा जाहला…

कारण तुझं ते
कधीही न बोललेलं,,,
ऐकण्या कान हा
आतुर जाहला…

गुपितं तुझी ती,
हृदयात गाडलेली…
बोलण्या ओंठही
अधीर जाहला…

प्रित माझी ती
मोगऱ्यासम फुललेली,,,
विणलेल्या फुलांचा तो
गजरा जाहला…

खंत मनातली ती
दाटूनी हृदयात राही,,,
फोडण्या हुंदकाही
अनावर जाहला…

देह माझा जेव्हा
खांद्यावरुनी निघाला,,
फुलांनी सजलेला तो
सोहळा जाहला…

(दिपी)✒
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा