You are currently viewing तू माझी…

तू माझी…

तू माझी

तुझ्या इवल्याशा डोळ्यात,
माझे प्रतिबिंब दिसू दे.
तू डोळे मिटल्यावर ते,
तुझ्या नजरेत सामावू देत.

तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर,
माझे हास्य खुलू देत.
तू गोड हसताना ते,
खळी पाडून उमलू देत.

तुझ्या अलगद पडलेल्या मिठीत,
आज मला विसावू देत.
तुझ्या हृदयाची धडकन ऐकत,
मला उराशी राहू देत.

तुझ्या नाजूक ओठांचा स्पर्श,
माझ्या ओठांना होऊ देत.
त्या ओठांतील मस्ती माझ्या,
अंगा-अंगात शिरू देत.

तुझ्या इवल्याशा डोळ्यात,,
माझे प्रतिबिंब दिसू देत…

*(दीपी)*
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 + sixteen =