You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे भारत सरकार हस्तकला विभागाच्या वतीने दिनांक 30 व 31 जानेवारी 2023 रोजी दोन दिवसीय हस्तकला कार्यशाळेचे आयोजन.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे भारत सरकार हस्तकला विभागाच्या वतीने दिनांक 30 व 31 जानेवारी 2023 रोजी दोन दिवसीय हस्तकला कार्यशाळेचे आयोजन.

युवराज लखमसावंत भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले
यांच्या विशेष प्रयत्नातून या कार्यशाळेचे आयोजन.

सावंतवाडी

भारत सरकारच्या हस्तकला विभागाच्या वतीने श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले युवराज्ञी श्रद्भाराजे भोंसले यांच्या प्रयत्नातुन महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळेचेआयोजन करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या हस्तकला विभागाच्यावतीने डॉ.आंबेडकर हस्तशिल्प विकास योजनेअंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 30/01/2023 व 31/01/2023 रोजी दोन दिवसीय हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये
कोल्हापुरी चप्पल , ज्वेलरी
लाकडी कलाकुसर,
पॅचवर्क, मातीच्या भांड्यावरील पेंटिंग,
वेत व बांबू कला, टेराकोटा, गंजिफा,बोलक्या बाहुल्या, चित्रकला या विषयांवर कार्यशाळेमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
वरील दोन दिवशीय कार्यशाळे ची वेळ सकाळी ९.३० ते सायंकाळी ३.३० आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सचिन देशमुख यांच्याकडे द्यावयाची आहेत. दुपारच्या ब्रेक मध्ये वर्किंग लंच पुरवण्यात येईल.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा