You are currently viewing उद्योग क्षेत्रात यश मिळविण्यासाठी मानवी उर्जेचे व्यवस्थापन महत्त्वाचे

उद्योग क्षेत्रात यश मिळविण्यासाठी मानवी उर्जेचे व्यवस्थापन महत्त्वाचे

कुडाळ :

एखाद्या संस्थेच्या विकासासाठी जसे संघटनात्मक कौशल्य, कार्यपद्धती, विविध समुहांशी परास्पर स्नेहसंबंध, कृती कार्यक्रम आणि इच्छित ध्येय गाठण्यासाठी कामाचे सातत्य महत्त्वाचे असते तसेच उद्योग क्षेञातही प्रत्येक व्यक्तीकडे असणाऱ्या उर्जे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे योग्य नियोजन केल्यास उद्योग क्षेत्रातही सकारात्मक परिणाम आपल्याला पहायला मिळतात, असे प्रतिपादन या क्षेत्रातील अभ्यासक व मार्गदर्शक श्री भगवान परब, मुंबई यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एम्. आय्. डि. सी. असोसिएशन कुडाळ व बॅ. नाथ पै. शैक्षणिक संस्था कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते.

मानवी कार्यक्षमता, दर्जा, पत याच्यावर मानवी उर्जेचा सकारात्मक परिणाम कसा होतो हे त्यानी प्रात्यक्षिकासह दाखवले.

यावेळी श्री परब यांचा दोन्ही संस्थाच्या वतीने कुडाळचे तहसीलदार मा. पाठक यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सिंधुदुर्गचे पोलीस निरीक्षक मा. सुनील धनावडे, बॅ. नाथ पै. शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश गाळवणकर, असोसिएशनचे अध्यक्ष श्री मोहन होडावडेकर, सचिव अॅड. नकुल पार्सेकर आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्योजक श्री संजीव कर्पे, श्री राजू केसरकर, श्री शशिकांत चव्हाण, श्री कुणाल वरसकर, डाॅ.नितीन पावसकर, श्री अमीत वळंजू, श्री राजन नाईक, संजीव प्रभू, आर. एस्. गवस, मुश्ताक शेख, शशिकांत चव्हाण, सौ. सिध्दी बिरमोळे, श्री व्यंकटेश भंडारी यासह उद्योगक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी व असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सुञसंचालन प्रा. अरूण मर्गज यांनी केले तर आभार सचिव अॅड नकुल पार्सेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =