You are currently viewing स्पर्धेत टिकण्यासाठी वाचन ही काळाची गरज – दयानंद कुबल

स्पर्धेत टिकण्यासाठी वाचन ही काळाची गरज – दयानंद कुबल

कोकण कला संस्थेकडून तीनशेहून अधिक पुस्तके भेट…

बांदा

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाचन ही काळाची गरज असून विष्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वाचनालयाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. भविष्यात वाचन संस्कृतीची चळवळ निर्माण करण्यासाठी कोकण कला संस्था निश्चितच आपल्यासोबत काम करेल, असे प्रतिपादन कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी येथे केले.

येथील नट वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरावडा दिनाच्या सांगता समारंभात श्री. कुबल बोलत होते. यावेळी त्यांनी कोकण कला संस्थेच्या वतीने ३०० हून अधिक दुर्मिळ ग्रंथ, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा, लहान मुलांसाठी शौर्य कथा अशी पुस्तके भेट दिली.

यावेळी वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सहकार्यवाह हेमंत मोर्ये, संचालक निलेश मोरजकर, अंकुश माजगावकर, संचालिका स्वप्नीता सावंत, शिक्षक जे. डी. पाटील, हंसराज गवळे, श्री. खानोलकर, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब आदिसह वाचक उपस्थित होते. यावेळी बांदा केंद्रशाळेचे शिक्षक जे. डी. पाटील व कास प्राथमिक शाळेच्या शिक्षिका स्वाती पाटील यांनी देखील ‘नवी दिशा नवे उपक्रम’ हे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक पुस्तक वाचनालयला भेट दिले.

श्री. कुबल यांनी यावेळी वाचनालयात दरवर्षी शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा घेण्यासाठी बक्षीस योजना जाहीर केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा