You are currently viewing सिंधुदुर्ग शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालयासाठी प्रभारी अधिष्ठाता पदी डॉ.पी.जी.दिक्षीत यांची शासनाकडून नियुक्ती….

सिंधुदुर्ग शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालयासाठी प्रभारी अधिष्ठाता पदी डॉ.पी.जी.दिक्षीत यांची शासनाकडून नियुक्ती….

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय याकरिता शासनाने वैदयकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली जिल्हा सिंधुदुर्ग येथे शासनाचे शासकीय वैदकीय महाविदयालय व त्यास संलग्नित रुग्णालय निर्माण करण्यास यापूर्वीच्या आदेशान्वये तत्वत: मान्यता प्रदान केली आहे. सदर आदेशाच्या अनुषंगाने जिल्हा सिंधुदुर्ग येथे शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय निर्माण करण्याच्या दृष्टीने शासन / केंद्र शासनाकडे पाठपुरावा करुन जागा हस्तांतरण आरोग्य सेवे बरोबर करावयाचा सामजस्यं करार तसेच भारतीय आयुर्विज्ञान परिषद / राष्ट्रीय वैदयक परिषद येथे अर्ज दाखल करणे व केंद्र शासनाची मान्यता प्राप्त करणे इ. कामे शिघ्र गतीने होण्याकरिता डॉ.पी.जी.दिक्षीत, विभाग प्रमुख प्राध्यापक न्यायवैदयकशास्त्र, शासकीय वैदयकीय महाविदयालय, मिरज यांना प्रभारी अधिष्ठाता म्हणून नियुक्त केले आहे.
डॉ.पी.जी.दिक्षीत,विभाग प्रमुख प्राध्यापक न्यायवैदयकशास्त्र, शासकीय वैदयकीय महाविदयालय, मिरज यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस येथे प्रस्तावित शासकीय वैदयकीय महाविदयालयाकरिता निर्माण करण्यात आलेल्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी दिनांक 23.10.2020 (म.उ) पासून कार्यमुक्त करण्यात आले आहे.
डॉ.पी.जी.दिक्षीत यांना शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग करिता प्रभारी अधिष्ठाता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अशा प्रकारचे आदेश दिनांक 23/10/2020 रोजी संचालक, वैदयकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांनी निर्गमित केले आहेत. अशी माहिती मा.खासदार विनायक राऊत  यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालय सिंधुदुर्ग ओरोस येथून पाठविण्यात येत आहे.

(सोमा अ.घाडीगावकर )

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + 18 =