You are currently viewing युवा मोर्चाची भक्कम बांधणी करण्यासाठी कटीबद्ध राहीन – प्रथमेश तेली

युवा मोर्चाची भक्कम बांधणी करण्यासाठी कटीबद्ध राहीन – प्रथमेश तेली

युवा मोर्चाची भक्कम बांधणी करण्यासाठी कटीबद्ध राहीन – प्रथमेश तेली

वेंगुर्ले
भाजपा वरिष्ठ नेत्यांनी आपल्यावर सिंधुदुर्ग ,रायगड व रत्नागिरी या तीन जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. आज वेंगुर्ले तालुक्यात भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने आपला प्रथमच सन्मान होतोय.आज केंद्र सरकार ,राज्य सरकार यांच्या अनेक योजना येत आहेत. श्री गणेश चतुर्थी नंतर तळागाळात योजना पोहचविण्यासाठी , त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तसेच युवा मोर्चाची भक्कम बांधणी करण्यासाठी कटीबद्ध राहीन ,अशी ग्वाही आज प्रथमेश तेली यांनी वेंगुर्ले भाजपा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात दिली.
भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रथमेश तेली यांचा शुक्रवारी वेंगुर्ले येथे भाजपाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी युवा मोर्चा च्या वतीनेही त्यांचा शाल , श्रीफळ व शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सुतार शिल्पकार समाजाचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मानित झालेले शरद मेस्त्री यांचाही प्रथमेश तेली यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई , माजी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप , जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस हितेश धुरी ,जिल्हा चिटणीस हेमंत गावडे ,मारुती दोडनशट्टी , वसंत तांडेल ,सरपंच संघटनेचे अध्यक्ष पप्पू परब , तुषार साळगावकर , दादा केळूसकर , प्रशांत खानोलकर , अणसूर सरपंच सत्यविजय गावडे , युवा मोर्चाचे प्रणव वायगाणकर , मनवेल फर्नाडिस ,सायमन आलमेडा ,हेमंत तुळसकर ,भूषण आंगचेकर , सुधाकर आंगचेकर ,समीर नाईक , वैभव होडावडेकर , शरद मेस्त्री ,शैलेश जामदार , नारायण गावडे , हेमंत मुलाणी ,गौरेश वायगणकर ,प्रणव धुरी आदी सह भाजपा पदाधिकारी ,युवा मोर्चाचे पदाधिकारी ,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना प्रसन्ना देसाई म्हणाले , भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा मोर्चाची फळी तयार करावयाची आहे.त्यासाठी सर्वांनी एकसंधपणे सामूहिकरित्या काम करावे. युवा मोर्चाने सरल एप च्या माध्यमातून व जास्तीत जास्त पदवीधर नोंदणी यासाठी काम करावयाचे असून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकूण 315 बूथ निहाय कार्यकर्ते तयार होण्याच्या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. प्रथमेश तेली यांना हे मिळालेले पद याचा विशेष आनंद असून त्याचा फायदा युवा मोर्चाच्या संघटना वाढीसाठी निश्चितच होईल ,असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , स्वागत व आभार हेमंत गावडे यांनी मानले.

*संवाद मिडिया*

*सुवर्ण संधी!सुवर्ण संधी!!फिजियोथेरेपी डॉक्टर होण्याची सुवर्ण संधी!!!*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)* करण्याची सुवर्णसंधी.

Affiliated to MUHS,Nashik,DMER व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कॉलेज मध्ये

*प्रवेश सुरु -शैक्षणिक वर्ष 2023-2024*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ फिजियोथेरेपी , दापोली.*

*COLLEGE CODE-6191*

*बॅचलर ऑफ फिजियोथेरेपी(B.P.Th)*
Eligibility- 12th Science (PCB)With NEET and Must Registered with CET Cell can apply.

• Duration : 4.5 Years

*👉मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्ती.(शासन नियमानुसार).*

*पत्ता:*
प्रांत ऑफिस जवळ,दापोली, ता. दापोली, जिल्हा रत्नागिरी, 415712

*संपर्क:*
📲 9145623747/ 9420156771/7887561247*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/107166/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा