You are currently viewing सावंतवाडी तलावातील पाण्याच्या वासाने उपोषणकर्ते हैराण

सावंतवाडी तलावातील पाण्याच्या वासाने उपोषणकर्ते हैराण

*सावंतवाडी नगर परिषदेसमोर होत असलेल्या उपोषणाची अधिकाऱ्यांनी अजूनही घेतली नाही दखल*

सावंतवाडी :

“अंधेर नगरी चौपट राजा” अशा शाळेचे बॅनर लावून सावंतवाडी नगरपालिकेसमोर सालईवाडा भागातील अनेक कुटुंबे रस्त्याच्या मागणीकरिता उपोषण करत आहेत. गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ सालईवाडा, जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या मागील बाजूस जवळपास पन्नास कुटुंबं घरे, बंगले, इमारत्यांमध्ये नगरपालिका प्रशासनाकडून रीतसर परवानगी घेऊन घरे बांधून वास्तव्यास आहेत. परंतु आजपर्यंत सदर वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याकडे नगरपालिका प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने आज २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रशासनाला जाग आणण्यासाठी या कुटुंबांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारत नगरपालिकेसमोर उपोषण छेडले आहे.

सदरच्या उपोषणाची पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अजूनही दाखल घेतली नसून खरोखरच *“अंधेर नगरी चौपट राजा”* अशीच परिस्थिती सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाची झालेली दिसून येत आहे. सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाने तलावातील झालेल्या चुकीच्या पद्धतीच्या गाळ उपसण्याच्या कामामुळे पडलेल्या कठड्याच्या कामासाठी पाणी सोडल्याने तलावाच्या पाण्यात साचलेल्या शेवाळ आणि मेलेल्या माशांमुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे तलावाच्या काठावर उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते देखील हैराण झाले आहेत. तलावाच्या काठी बसणारे अनेक शहर वासिय देखील नाक मुठीत घेऊन बसतात अशी परिस्थिती आहे परंतु नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना त्याचे काहीही सोयरसुतक राहिलेले नसून सावंतवाडी शहर नामदार केसरकर आणि इतर लोकप्रतिनिधींनीही वाऱ्यावर सोडले आहे.

नगरपालिकेवर प्रशासक म्हणून असलेले प्रांताधिकारी आणि जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सदर बाबींची दखल घ्यावी अशी मागणी शहर वासियांकडून होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =